मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: निवडणूक अधिकारी PPE Kit घालून करणार मतमोजणी

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: निवडणूक अधिकारी PPE Kit घालून करणार मतमोजणी

Pandharpur Assembly by-election: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवार (2 मे 2021) रोजी मतमोजणी होणार आहे.

Pandharpur Assembly by-election: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवार (2 मे 2021) रोजी मतमोजणी होणार आहे.

Pandharpur Assembly by-election: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवार (2 मे 2021) रोजी मतमोजणी होणार आहे.

पंढरपूर, 1 मे: पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकी (Pandharpur Assembly by-election)साठी रविवारी म्हणजेच 2 मे 2021 रोजी मतमोजणी (Vote counting) होणार आहे. सध्या असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विशेष काळजी घेत मतमोजणी करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी मतमोजणी करणारे अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यासाठी पीपीई किटची (PPE Kit) सुविधा उपलब्ध असणार आहे.

मतमोजणी टेबलवर नियुक्त असलेले अधिकारी, कर्मचारी यांना सॅनिटायझर (Sanitizer), मास्क (Mask), फेसशिल्ड (Face shield), पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. यासोबतच मतमोजणी कक्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 2 मे 2021 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीबाबत तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रात सर्वत्र औषध फवारणी करुन घेण्यात आली आहे. मतमोजणी केद्रात विद्युत जोडण्यात कुठेही शॉर्टसर्किट होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भागीरत भालके यांना उमेदवारी दिली होती तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

First published:

Tags: Assam Election, Coronavirus, Pandharpur