पालघर, 25 जून : जव्हार तालुक्यातील देहेरे पैकी कडव्याचीमाळ येथील मंगला वाघ वय 30 या विवाहितेने घरातील हालाकीच्या परिस्थितीला कंटाळून बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला आधी तिच्या 3 वर्षीय मुलगी रोशनी हिला साडीने गळफास देऊन ठार मारले आणि नंतर तिने स्वतः गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना मंगळवारी घडली मात्र ती बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. मंगळवारी दिलीप कामावरून घरी परत आल्यानंतर पत्नी व लहान मुलगी घरी नाही म्हणून मोठ्या मुलीला विचारले, मात्र तिलाही माहीत नव्हते. त्यानंतर ती नातेवाईकांकडे गेली असेल, येईल संध्याकाळ पर्यंत.. असा अंदाज केला. पण ती रात्र झाली तरी काही घरी आली नाही. हेही वाचा - महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद, दोन मुली आणि सहा महिन्याचा मुलगा झाला पोरका पत्नी आणि मुलीच्या शोधात नंतर तो मंगळवार रात्रीपासून ते बुधवार सकाळपर्यंत आजूबाजूच्या नातेवाईकाच्या घरी फिरला. मात्र तेथेही तिचा पत्ता लागला नाही. अखेर बुधवारी दुपारी तो व तिची मोठी मुलगी हिला घेऊन नवापाड येथे आला असता तेथील एका मुलाने व्हॉट्सअॅपवर एका महिलेने व सोबत एका लहान मुलीने बोरीचमाळ येथील मोहाच्या झाडाला साडीने गळफास घेतल्याचे फोटो दाखवले. त्यावेळी त्याला हे बघून धक्काच बसला. ती मंगला व तिची मुलगी रोशनी हिचाच फोटो असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आदिवासी कातकरी समाजाचे दुर्भिक्ष्य आजही या भागात असल्याचं या घटनेनंतर अधोरेखित झालं आहे. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.