उस्मानाबाद, 24 ऑगस्ट : एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव थाटामाटात साजरा केला. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाले तरी महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा बोजवारा सांगणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती ही चक्क स्वच्छतागृहात झाली आहे. काय आहे संपूर्ण घटना - महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा बोजवारा सांगणारी ही घटना उस्मानाबादमधील स्त्री रुग्णालयात घडली. याप्रकारे चक्क स्वच्छतागृहात एका महिलेची प्रसूती झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रुक्मिणी सुतार असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातील मसाला गाव येथील रहिवासी आहे. रुक्मिणी सुतार या काल रात्री डिलिव्हरी साठी स्त्री रुग्णालयात दाखल झाल्या. मात्र, त्यांना आवश्यक ती सेवा मिळाली नाही. दवाखान्यात महिलांचे झालेली फुल्ल गर्दी त्यामुळे त्यांना बेड उपलब्ध होऊ झाला नाही. इतकेच नव्हे तर त्याठिकाणी अवघ्या दोन परिचारिका उपलब्ध होत्या. यावेळी रुक्मिणी यांना परिसरात चकरा मारा असे सांगण्यात आले. यावेळी अचानक टॉयलेट आल्याने त्या स्वच्छतागृहात गेल्या. याच वेळी रुक्मिणी यांना प्रसूती कळा सुरू झाल्या आणि तिथेच त्यांची प्रसूती झाली. हेही वाचा - आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचारीच गायब; महिलेची भरपावसात रस्त्यावरच प्रसूती, जालन्यातील धक्कादायक घटनेचा VIDEO स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतरही राज्यात मूलभूत आरोग्य सेवांसाठी नागरिकांची वणवण होत आहे. अशाप्रकारे मूलभूत आरोग्य सेवांअभावी एका महिलेची चक्क स्वच्छतागृहात प्रसूती होत आहे, या घटनेने आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.