• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Onion Rate : व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांचा परिणाम? कांद्यांचे दर झाले इतके कमी

Onion Rate : व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांचा परिणाम? कांद्यांचे दर झाले इतके कमी

मुंबईत कांद्याच्या दरात प्रति किलो 15 रुपयांपर्यंत घट झाली ( latest onion rate) आहे. दोन दिवसांपूर्वी 45 रुपये किलोने विकला जात असलेल्या कांद्याला आज 30 रुपये किलो भावाने मिळत आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव मंडईत व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागानं छापा टाकल्याचा परिणाम आता कांद्याच्या भावात दिसू लागला आहे. मुंबईत कांद्याच्या दरात प्रति किलो 15 रुपयांपर्यंत घट झाली ( latest onion rate) आहे. दोन दिवसांपूर्वी 45 रुपये किलोने विकला जात असलेल्या कांद्याला आज 30 रुपये किलो भावाने मिळत आहे. मुंबईत आज कांद्याची आवक 100 क्विंटल झाली आहे. त्यामुळं कांद्याची (onion) किंमत आणखी खाली येण्याची आशा लोकांना आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांची कार्यालये आणि बँक खाती तपासली होती. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली आहे. त्यांची विक्री आणि बिल पुस्तके इत्यादींची तपासणी करण्यात आली. या हालचालींमुळे बाजार नियंत्रणात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे वाचा - I LOVE YOU म्हणत चक्क भल्यामोठ्या सापालाच KISS देत राहिली आणि…; VIDEO पाहून अंगावर काटा येईल महागाई नियंत्रित करण्यासाठी कारवाई? मुसळधार पावसामुळे शेतात लावलेल्या कांद्याची रोपे खराब झाली आहेत. दुसरीकडे बदललेल्या हवामानाचा उन्हाळ्यात साठवलेल्या कांद्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे कांद्याचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यातील दरी रुंदावत आहे. परिणामी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात किरकोळ बाजारात कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. पण आता प्राप्तिकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याचा भाव पूर्वीपेक्षा नियंत्रणात आला आहे. कांद्याचे व्यापारी साठवून भाव वाढवत होते असे या कारवाईवरून दिसत आहे. हे वाचा - Aadhaar द्वारे बँक खातं रिकामं होऊ शकतं? UIDAI ने दिली महत्त्वपूर्ण माहिती कांदा उत्पादकांचे म्हणणे काय? महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे म्हणाले की, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार प्राप्तिकर विभागाला आहे. होर्डिंग लावून दरवाढ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. दिघोळे म्हणतात की, कांदा उत्पादक शेतकरी यापुढे विक्रीसाठी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहणार नाहीत. ते थेट विक्रीचे नियोजन करत आहेत जेणेकरून शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल. व्यापाऱ्यांमुळे या दोघांना सर्वाधिक त्रास होत आहे. कांद्याचे राज्यातील घाऊक बाजारातील दर -
  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
  25/10/2021 अहमदनगर --- क्विंटल 5469 1250 3100 2050
  25/10/2021 अहमदनगर उन्हाळी क्विंटल 6191 200 3050 2375
  25/10/2021 अमरावती --- क्विंटल 8 1300 4500 2900
  25/10/2021 औरंगाबाद --- क्विंटल 730 200 2400 1300
  25/10/2021 जळगाव लाल क्विंटल 668 500 2375 1750
  25/10/2021 कोल्हापूर --- क्विंटल 3983 500 3750 1800
  25/10/2021 नागपूर लाल क्विंटल 1520 2500 4000 3625
  25/10/2021 नागपूर पांढरा क्विंटल 1000 2500 3500 3250
  25/10/2021 नाशिक उन्हाळी क्विंटल 79351 759 3141 2614
  25/10/2021 पुणे लोकल क्विंटल 10214 1225 2325 1788
  25/10/2021 सांगली --- क्विंटल 20 1000 1500 1350
  25/10/2021 सांगली लोकल क्विंटल 3307 500 2800 1650
  25/10/2021 सातारा लोकल क्विंटल 65 1200 3200 2000
  25/10/2021 सोलापूर --- क्विंटल 346 100 2000 1000
  25/10/2021 सोलापूर लाल क्विंटल 15218 100 4000 1700
  25/10/2021 ठाणे नं. १ क्विंटल 3 3000 3400 3200
  25/10/2021 ठाणे नं. २ क्विंटल 3 2500 3000 2750
  राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 128096
  Published by:News18 Desk
  First published: