News18 Lokmat

विठ्ठल दर्शनाची लागलीसी आस

वाखरीच्या रिंगणामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.त्यात भर म्हणजे वारकऱ्यांचं माहेर असलेल्या पंढरीत आज ते विसावणार असल्यानं त्या आनंदात भर पडलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2017 09:44 AM IST

विठ्ठल दर्शनाची लागलीसी आस

03 जुलै : वाखरीचा मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज लाखो वारकऱ्यांसमवेत पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहेत. वाखरीच्या रिंगणामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.त्यात भर म्हणजे वारकऱ्यांचं माहेर असलेल्या पंढरीत आज ते विसावणार असल्यानं त्या आनंदात भर पडलीय.

पंढरीत आल्यावर चंद्रभागेत जायचं, स्नान करायचं आणि विठुरायाचं दर्शन घ्यायचं हा वारकऱ्यांचा नेम असतो.त्यामुळे पंढरीत आल्यानंतर वारकऱ्यांची पावलं चंद्रभागेकडे वळणार आहेत.राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक आल्यानं सर्व पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...