जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nitesh Rane: नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा

Nitesh Rane: नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा

Nitesh Rane: नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा

Nitesh Rane: भाजप आमदार नितेश राणे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज पुन्हा कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.

  • -MIN READ
  • Last Updated :

विशाल रेवडेकर, प्रतिनिधी कणकवली, 4 फेब्रुवारी: शिवसैनिक संतोष परब (Shivsainik Santosh Parab) यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयाने (Kankavali Court) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा नितेश राणे यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद झाला. सरकारी पक्षाने नितेश राणे यांची आणखी 8 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद संपल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे नितेश राणेंच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नितेश राणे यांच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्ज करण्यात येत आहे. तपासाची व्याप्ती मोठी, पुण्याला नेऊन तपास करायचाय तपासाकरता वेळ कमी पडला आहे. तपासाची व्याप्ती मोठी आहे. राज्याबाहेर जाऊन देखील तपास करायचा आहे. आरोपीला पुण्याला नेऊन काही तपास करायचा आहे, काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का याबाबतही तपास करायचा आहे. आणखी तपास करण्यास वेळ मिळावा, या करता किमान 8 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. गोव्यात तपास करुन काय उपयोग? यावेळी सतिश मानेशिंदे यांनी युक्तिवाद करत म्हटलं, तपास पूर्ण झाला आहे. गोव्यात तपास करुन काय उपयोग, 18 डिसेंबर नंतर घडलेल्या घटनांचा तपास करण्याचा अधिकार नाही. लपून बसलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी अटक आरोपींची कस्टडी घेता येणार नाही. वाचा :  नितेश राणेंना घेऊन सिंधुदुर्ग पोलिसांनी गोवा गाठलं, पुरावा मिळाला? 2 फेब्रुवारीला नितेश राणे न्यायालयात शरण अटकपूर्व जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धावाधाव करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांना अखेर न्याय व्यवस्थेपुढे शरण यावे लागले आहे. 2 फेब्रुवारी रोजी नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची म्हणजेच 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सुरुवातीला न्यायालयाने नितेश राणे यांना दिलासा देत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण, सरकारी वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला आणि कडाडून विरोध केला. अखेर सरकारी वकिलांचा युक्तीवाद आणि पोलिसांनी दिलेले सबळ पुरावे यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. वाचा :  नितेश राणेंचा 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम कोर्टाबाहेर पोलिसांसोबत बाचाबाचीनंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर 1 फेब्रुवारी रोजी सुनावणी संपल्यानंतर जे काही झालं त्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी निलेश राणेंसह भाजपच्या अन्य पाच जणांवर ओरोस पोलीस स्थानकात उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 188, 269, 270, 186 या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांच्या जामीनावरील सुनावणीनंतर न्यायालया बाहेर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. जमाव केल्याप्रकरणी आणि पोलिसांशी हुज्जत, शांततेचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. व्हिडीओ शूटिंग पाहून अन्य जणांवर ही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे समजते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात