बारामती, 21 नोव्हेंबर: एकीकडे स्त्रीभ्रुणहत्येतचं प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे बारामतीत एका कुटुंबाने आपल्या नवजात कन्येचं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं स्वागत केलं आहे. या कुटुंबाने रूग्णालयापासून घरपर्यंत वरात काढून तिचं स्वागत केलं. बारामतीत केबलचा व्यवसाय करणाऱ्या अमोल दोशी यांच्या घरात कन्यारत्न जन्माला आलं आणि या कुटुंबाच्या आनंदाला पारावारच उरला नाही. समाजात आजही मुलींच्या जन्माविषयी वेगवेगळे समज असताना दोशी कुटुंबीयांनी स्त्रीजन्माचा आनंद साजरा केला. या कुटुंबीयांनी नवजात कन्येसह तिच्या मातेची रुग्णालयापासून घरापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत केलं. मुलगी जन्माला आली म्हणून छळ झाल्याच्या, अनेकांना पतीने घटस्फोट दिल्याच्या घटना पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं स्वागत करणाऱ्या दोशी कुटुंबीयांनी बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश दिलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







