जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gondia News : NEET परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Gondia News : NEET परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

कमी गुण मिळाल्याचा धक्का अन् विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

कमी गुण मिळाल्याचा धक्का अन् विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

Gondia News : डॉक्टर होण्याचं स्वप्न राहिलं अधूरं, परीक्षेचा निकाल लागला आणि विद्यार्थिनीने जे केलं ते अंगावर काटा आणणारं

  • -MIN READ Gondiya,Gondiya,Maharashtra
  • Last Updated :

रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया : ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर व्हावं हे स्वप्न असतं त्यांच्यासाठी नीटची परीक्षा फार महत्त्वाची असते. नीट परीक्षेत स्कोअर झाला नाही तर चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणं कठीण होतं. त्यामुळे नीटला चांगले मार्क मिळावेत यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस झटत असतात. मात्र स्कोअर कव्हर न झाल्याने नैराश्य येतं आणि टोकाचं पाऊल उचललं जातं. अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. नीट परीक्षेचा निकाल 13 जून रोजी रात्री अकरा वाजता लागला. त्यानंतर गुण पाहिल्यावर विद्यार्थिनीच्या पायाखालची जमीन सरकली. अभ्यास करुनही मार्क कमी मिळाल्याचा धक्का सहन झाला नाही.

NEET UG परीक्षेचा निकाल; या लिंकवरून लगेच करा चेक
News18लोकमत
News18लोकमत

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सलोनी गौतम या विद्यार्थिनीने आपलं आयुष्य संपवलं आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिने पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. NEET परीक्षेच्या निकाल रात्री उशिरापर्यंत अकरा वाजता लागला घरातील सर्व झोपी गेले होते. नीट परीक्षेत सलोनीला कमी मार्क मिळाले त्यामुळे नैराश येऊन तिने रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली.

  ‘हे’ आहेत राज्यातील टॉप मेडिकल कॉलेजेस; NEET UG 2023 च्या मार्कांवर थेट मिळेल प्रवेश

या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांना समुपदेशनाची नितांत गरज असल्याचे यावरून स्पष्ट होते. NEET बोर्डाने सुद्धा दिवसा रिजल्ट दिलेलं चांगलं जेणेकरून मुलांवर पालकांना लक्ष देण्यास मदत होईल अशी मागणी नागरिक करत आहेत. उच्च स्तरीय तपासणी साठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे नेण्यात आलं असून या घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात