हिंगोली, 13 ऑक्टोबर : हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli News) वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) बसविण्यात येणार आहे. आज शहरामध्ये महाराजांच्या पुतळ्याच आगमन झालं. यावेळी वसमतचे राष्ट्रवादीचे (NCP MLA) आमदार राजू नवघरे यांनी पुतळ्याच स्वागत करत असताना, चक्क महाराजांच्या पुतळ्यावर चढून, छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला.
हा हार घालत असलेला व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल (Video Viral on Social Media) झाला असून पुतळ्यावर चढून हार घालण्याच्या राजू नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरांमधून निषेध होऊ लागला आहे.
हे ही वाचा-शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी चेन्नईहून निघालेलं विमान थेट मुंबईला लँड
परंतू व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि समाज माध्यमांमध्ये असलेल्या प्रतिक्रियांवर राजू नवघरे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो. कधीही मोठेपणासाठी कोणतंही काम केले नाही. (NCP MLAs climbed the statue of Chhatrapati Shivaji Maharaj VIDEO goes viral on social media)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी NCP चे आमदार राजू नवघरे चढले पुतळ्यावर; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल pic.twitter.com/EuUm1NRQGp
जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मला माफ करा. असे म्हणत प्रकरण संपवण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे ते बोलत असताना नवघरे यांनी आपली चूक झाली असेल, तर आपल्याला फासावर लटकवा असंही म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.