जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jitendra Awhad : राऊत बाहेर आव्हाड आत; 'हर हर महादेव' प्रकरण भोवलं!

Jitendra Awhad : राऊत बाहेर आव्हाड आत; 'हर हर महादेव' प्रकरण भोवलं!

Jitendra Awhad : राऊत बाहेर आव्हाड आत; 'हर हर महादेव' प्रकरण भोवलं!

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना आज (दि.11) शुक्रवारी ठाण्यातील वर्तक नगरमधून अटक करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना आज (दि.11) शुक्रवारी ठाण्यातील वर्तक नगरमधून अटक करण्यात आली आहे. यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हरहर महादेवचे स्क्रिनिंग बळजबरीने बंद केल्याबद्दल आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर आव्हाडांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी आव्हाड यांनी याबाबत खुलासा केला आहे.

जाहिरात

आव्हाड म्हणाले की, आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.

हे ही वाचा :  ‘ही मुजोरी मोडून काढलीच पाहिजे’; संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहत केले कौतुक

जाहिरात

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. असे आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

जाहिरात

दरम्यान आव्हाडांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 141, 143, 146, 149, 323, 504 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 37/135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद पाडताना प्रेक्षकांशी भांडल्याच्या प्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत.

हे ही वाचा :  ‘शिंदे-भाजपचे काही निर्णय चांगले’, जेलमधून आल्यानंतर संजय राऊत नरमले?

जाहिरात

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान हर हर महादेव चित्रपटाचे शो बंद पाडताना  आव्हाड यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. याच प्रकरणामध्ये आव्हाड यांच्यासहीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना पोलीस स्थानकामध्ये बोलवून घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात