बारमध्ये महिलांना 'नो शर्ट फ्री बियर' अशी ऑफर; महाराष्ट्रातील या शहरातील धक्कादायक प्रकार

बारमध्ये महिलांना 'नो शर्ट फ्री बियर' अशी ऑफर; महाराष्ट्रातील या शहरातील धक्कादायक प्रकार

नवी मुंबईतील एका बियर बारने गर्दी खेचण्यासाठी धक्कादायक प्रकार केल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 27 ऑक्टोबर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा करत अनेक बाबींवर निर्बंध लादले. साहजिकच यामध्ये बियर बार आणि दारूची दुकाने यांचाही समावेश होता. त्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दारूच्या दुकांनावर मद्यप्रेमींची मोठी झुंबड उडाली. यामुळे बियर बार आणि दारू दुकाने चर्चेत होती. अशातच नवी मुंबईतील एका बियर बारने गर्दी खेचण्यासाठी धक्कादायक प्रकार केल्याचं समोर आलं आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये विचित्र व अश्लील जाहिराती देण्यात आल्या आहेत. पुरुषांसाठी नो शर्ट नो सर्विस, तर महिलांसाठी नो शर्ट फ्री बियरची ऑफर या बारमध्ये ठेवण्यात आली आहे. यासोबतच अल्कोहोल किल्स कोरोना, असा दावा करणारी जाहिरातही या बारमध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा - लातूरमध्ये खून आणि चोरी केली अन् मुंबईजवळच्या शहरात जाऊन लपला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी मुंबईतील पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट् जॅक्स बारमध्ये हा प्रकार होत असल्याचं समोर आलं आहे. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला.

दरम्यान, या बारमधील विचित्र ऑफरची शहरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. बारमध्ये अश्लील जाहिरात देणाऱ्या संबंधितांवर कारवाई होणार का, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: October 27, 2020, 7:42 AM IST
Tags: liq

ताज्या बातम्या