जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Veer Savarkar : सर्व भारतीयांना प्रेरणा देणारं सावरकरांचं घर कसं आहे? पाहा Video

Veer Savarkar : सर्व भारतीयांना प्रेरणा देणारं सावरकरांचं घर कसं आहे? पाहा Video

Veer Savarkar : सर्व भारतीयांना प्रेरणा देणारं सावरकरांचं घर कसं आहे? पाहा Video

Veer Savarkar : नाशिक जिल्ह्यातील भगूर हे सावरकरांचं जन्म गाव. भगूरमधील सावरकरांचं घर हे भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 26 फेब्रुवारी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अक्षरश: जीवाची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज (26 फेब्रुवारी) पुण्यतिथी आहे. क्रांतीकारक चळवळीनं तेव्हाच्या बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडणाऱ्या सावरकरांचा जन्म महाराष्ट्रातला आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर हे सावरकरांचं जन्म गाव. भगूरमधील सावरकरांचं घर हे भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहे. सावरकरांचा जीवनप्रवास स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी झिजवलं. 28मे 1883 रोजी त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव दामोदर तर आईचे नाव राधाबाई सावरकर होते. त्यांना दोन भाऊ आणि एक बहीण होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे शिवाजी विद्यालयात झाले. सावरकर हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. आई वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले होते,आई त्यांना रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगात असे.  त्यांचं बालपण आनंदात जात होतं, त्याचवेळी  नियतीने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या आईचं निधन झालं. तेव्हा त्यांचं वय नऊ वर्ष होतं. त्यानंतर सात वर्षांनी त्यांच्या वडिलांचे प्लेगमुळे निधन झाले आणि सावरकरांना दुसरा मोठा धक्का बसला. मात्र सावरकर डगमगले नाहीत. ते या दु:खातून सावरले. सावरकरांविषयी ह्या 10 गोष्टी माहित आहे का? काय होता द्विराष्ट्र सिद्धांत सावरकर अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांनी शिवाजी विद्यालयातून 1901 साली मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. तेव्हाच त्यांचं लग्न यमुनाबाई यांच्याशी झालं. त्यांनी पुडील शिक्षण त्यांनी पुण्यात करायचं ठरवलं.  लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील  प्रसिद्ध असलेल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये ते बीएचे शिक्षण घेत असतानाच स्वदेशी चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या या चळवळीमध्ये विदेशी वस्तूंची  होळी करण्यात आली. या चळवळीमध्ये सावरकरांनी आपला सहभाग नोंदवला. याच काळात 1904 साली सावरकरांनी ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेची  स्थापना केली. स्वातंत्र्य मिळावं आणि त्यासाठी प्रयत्न करावे हाच या संस्थेचा मुख्य हेतू होता. बीएचं शिक्षण झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. लंडनमध्ये राहूनही त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू ठेवले. वीर सावरकरांबद्दल ‘ह्या’ खास गोष्टी तुम्हाला माहित नसतील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय योगदान दिलंच. त्याचबरोबर अनेक क्रांतीकारांचे ते प्रेरणास्थान होते. ब्रिटीश सरकारनं त्यांना काळे पाण्याची शिक्षा देऊन अंदमानला पाठवलं. अंदमानातील कोठडीत त्यांना अक्षरश: घाण्याला जुंपण्यात आले. हे सर्व हाल सहन करूनही सावरकर डगमगले नाहीत. अंदमानातून परत आल्यानंतर सावरकरांनी समाजसुधारणेसाठी मोठे कार्य केले. हिंदू धर्मातील जातीभेत दूर व्हावेत यासाठी सतत प्रयत्न केले. हिंदू महासभा या राजकीय पक्षाची स्थापना केली.  26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले. देहाकडून देवाकडं जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो. हे वाक्य जे फक्त बोलून थांबले नाहीत तर संपूर्ण आयुष्य ते या पद्धतीनं जगले. सावरकरांचे विचार हे नेहमीच प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे जन्मगावातील घराला आजही अनेकजण नियमित भेट देतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nashik
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात