मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अहो, आश्चर्यम्! नाशिकच्या 21 वर्षांच्या चारूदत्तने केलीय हजारो अभंगांची रचना, तेही कोणत्याही अध्यात्मिक शिक्षणाशिवाय, पहा VIDEO

अहो, आश्चर्यम्! नाशिकच्या 21 वर्षांच्या चारूदत्तने केलीय हजारो अभंगांची रचना, तेही कोणत्याही अध्यात्मिक शिक्षणाशिवाय, पहा VIDEO

X
चारूदत्त

चारूदत्त थोरात

नाशिकच्या चारूदत्त थोरातने वयाच्या 18 व्या वर्षी 'दत्ताश्रय' नावाचा ग्रंथ लिहिलाय, तर 21 वर्षा हजारों अभंगांची रचना केलीय. हे अभंग घरातील दारं, खिडक्या, खुर्च्या, भांडी आणि भिंतींवर लिहिले आहेत. विशेष हे की, त्याने कोणतंही अध्यात्मिक शिक्षण घेतलेलं नाही.

पुढे वाचा ...

    नाशिक 13 जून; नाशिकच्या पेठ रोड परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय चारुदत्त थोरात (Charudatta Thorat) या सर्वसाधारण मुलाबद्दल आपण का बोलतोय, हा प्रश्न अनेकांना पडलाच असेल. तर आपण या तेजस्वी तरुणाबद्दल यामुळे बोलतोय. कारण, वयाच्या 18 व्या वर्षी त्याने 'दत्ताश्रय' नावाचा ग्रंथ लिहिलाय. इतकंच नाही, तर त्याने घरातील भांडी, भिंती, खुर्च्या, टेबल, दरवाजा, खिडक्या... असा एकही कोपरा सोडला नाही जिथं त्याने स्वरचीत अभंग लिहिले नसतील. विशेष हे की, त्यांनी यासाठी कोणत्याही प्रकारचे धार्मिक किंवा अध्यात्मिक शिक्षण घेतलेले नाही. (Thousands of Abhangs written by 21 year old Charudatta Thorat)

    हा 21 वर्षांचा चारुदत्त थोरात दत्ताश्रय नावाचा ग्रंथ अगदी कमी वयात लिहिला आहे, तसेच त्यांना आपल्या स्वरचीत अभंगाने घरातील प्रत्येक कोपर्‍यात, भांड्यांवर, कपाट, मशीन, मिक्सर, फॅन... अशा सर्व वस्तू भरलेल्या आहेत. त्या अभंगाचे संख्या इतकी आहे की, ते एकत्र केले तर त्याचं एक पुस्तक तयार होईल. चारुदत्तच्या घरात प्रवेश करताच त्याने स्वतः रचलेल्या अद्भुत अशा अभंगांचे लिखाण पावलोपावली आपल्याला दिसते.

    वाचा : Swapna Shastra: घरातील मृत व्यक्ती तुमच्याही स्वप्नात दिसतात का? त्याचा असा अर्थ असू शकतो

    त्याच्या घरातील क्वचितच एखादा असा कोपरा सुटला असावा, जो अभंगाच्या रूपात शाहीत रंगला नसेल. या दत्ताश्रय ग्रंथात मानवी जीवनाच्या अंतिम आणि शाश्वत सत्याच रहस्य उलगडल्याचा दावा चारुदत्त थोरात यांनी केला आहे. चारुदत्तचे अगम्य लिपीत लिहिलेले अभंग त्याच्या ज्ञानाच्या सीमांचं दर्शन घडवणारे आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 12 व्या वर्षांत जशी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच पद्धतीने वयाच्या १३ व्या वर्षांपासून चारुदत्तने अभंग लिहिण्यास सुरूवात केली, असल्याचं त्याचे आई-वडील सांगतात.

    यावर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे मत काय?

    आम्ही चारुदत्त थोरात यांच्या विषयी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे  यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "प्रत्येकाची श्रद्धा असावी, तो संविधानाने दिलेला हक्क आहे. मात्र, कोणी जर असा दावा करत असेल की, परमेश्वराचा साक्षात्कार झाला आहे तर ते चुकीचं आहे. अंधश्रद्धेचा बाजार कोणी मांडू नये", अस चांदगुडे यांनी सांगितलं. मात्र, चारुदत्तच कमी वयात एवढ्या गहन विषयांवरील लेखन पाहता अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय, असे उद्गार आपल्या तोंडून निघाल्याशिवाय राहणार नाही.

    First published: