Home /News /maharashtra /

Success Story : आई-वडील मूकबधिर, परिस्थिती बेताची, तरीही नाशिकच्या श्वेताने घर सांभाळत दहावीत मिळवले 91 टक्के : VIDEO

Success Story : आई-वडील मूकबधिर, परिस्थिती बेताची, तरीही नाशिकच्या श्वेताने घर सांभाळत दहावीत मिळवले 91 टक्के : VIDEO

मूकबधिक

मूकबधिक आई-वडिलांसोबत श्वेता चव्हाण.

आई-वडील जन्मताच मूकबधिर आहेत. घरची परिस्थितीही बेताचीच आहे. तरीही नाशिकच्या श्वेताने घर आणि आई-वडिलांना सांभाळत पहाटेचा अभ्यास केला. त्याच्या जोरावर श्वेताने दहावीच्या परीक्षेत 91 टक्के मार्क्स मिळवले.

    नाशिक, 20 जून : आई-वडील दोघंही मूकबधिर... घरची परिस्थिती बेताची... घरातील सगळी कामं करायची... पहाटेचं जागून अभ्यास करायचा आणि शेवटी आपल्याला हवं ते यश खेचून आणायचं, ही गोष्टी सोपी नक्कीच नाही. पण, नाशिकच्या श्वेता चव्हाण हिने ते शक्य करून दाखवलं आहे. तिने प्रतिकूल परिस्थिती मात करत दहावीच्या परीक्षेत तब्बल 91.60 टक्के मार्क्स (10th board exam) मिळवलेत. तिच्या यशाकडे पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात तरळलेले आनंदाश्रू मुलीने उपसलेले कष्ट दाखवून देतात. (Shweta Chavan scored 91 percent in the 10th exam) श्वेता मूळची इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब या गावची रहिवासी. मात्र, ती आपल्या आई-वडिलांसोबत मागील काही वर्षांपासून नाशिक शहरात राहते. वडील गोरक्षनाथ चव्हाण महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात अल्पशा पगारावर नोकरी करतात. तर आई दिपाली गृहिणी आहे. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. श्वेता लहानपणापासूनच हुशार होती. तिला अभ्यासाची आवड आहे. तिचे पहिली ते चौथीपर्यंतच शिक्षण नाशिकमधील नवभारत विद्यालयात झाले. त्यानंतर पुढील शिक्षण तिने श्रीराम विद्यालयात घेतले. वाचा : Success story : औरंगबादमध्ये हवा फक्त आजीचीच! नातीसोबत अभ्यास करून, 60 व्या वर्षी आजीला दहावीत मिळाले 56 टक्के अभ्यासासोबत तिला चित्रकलेची आणि डान्सची आवड आहे. आई-वडील जन्मताच मूकबधीर आहेत. पण आपल्या लेकीने शिकून मोठ व्हावं, ही त्यांची इच्छा आहे. आई-वडील मुकबधीर असल्याने श्वेताला घरातील सर्व काम करावी लागतात. अगदी सकाळी चहा, नाश्ता करण्यापासून तर रात्री झोपेपर्यंतची सर्वच काम श्वेता करत असते. मात्र, ही सर्व जबाबदारी सांभाळत श्वेताने पहाटे उठून आपला दहावीचा अभ्यास पूर्ण केला. श्वेता सांगते की, "आई-वडील झोपलेले असताना मी पहाटे उठून अभ्यास करायची. कारण, त्यावेळी आई-वडिलांचं कोणतही काम नसायचं. पहाटेचा अभ्यास करून झाला की, मग घरातील कामाला लागायचं. घरातील काम आटोपली की, सगळं आवरून शाळेत जायचं. हाच माझा दिनक्रम असायचा. दहावीच्या परीक्षेत इतके मार्क्स मिळाले आहे, त्यामुळे आनंद खूप आहे", अशा भावना श्वेता व्यक्त करते. वाचा : Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी! श्वेताच्या यशाबद्दल तिची आजी लिलाबाई चव्हाण सांगतात की, "माझी नात हुशार आहे. तिने दहावीत चांगले मार्क्स पाडले. तिला पुढे जे काही करायचं आहे, तिला आमचा पूर्ण पाठिंबा आहे." तर श्वेताचे काका सांगतात की, "श्वेताने इतकी चांगले मार्क्स पाडून चव्हाण कुटुंबात चांगलं यश मिळवलं आहे. तिचा आम्हाला गर्व आहे." श्वेताला भविष्यात चार्टड अकाऊंटंट बनण्याच आहे. आई-वडील जरी मुकबधीर असले तरी तिचे काका दिपक चव्हाण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ते तिला पुढील शिक्षणास मदत करण्यास तयार आहेत. त्यामुळे श्वेताच हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. मात्र, श्वेताने तिच्या या यशातून इतर विद्यार्थ्यांना दिलेली प्रेरणा खूप मोलाची आहे.
    First published:

    Tags: 10th class, Board Exam, Ssc board, Success story

    पुढील बातम्या