जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वडिल मृत्यूच्या दारात असताना परीक्षा देणारी लेक पोलीस भरतीमध्ये पहिली, Video

वडिल मृत्यूच्या दारात असताना परीक्षा देणारी लेक पोलीस भरतीमध्ये पहिली, Video

वडिल मृत्यूच्या दारात असताना परीक्षा देणारी लेक पोलीस भरतीमध्ये पहिली, Video

वडिल मृत्यूच्या दारात असताना तिनं पोलीस भरतीची परीक्षा दिली. यामध्ये ती मुलींमध्ये पहिली आली आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 27 एप्रिल : घरची परिस्थिती हालाखीची आहे आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. म्हणून मला यश मिळत नाही असे म्हणणारे तुम्ही अनेक जण पाहिले असतील. मात्र, नाशिक जिल्ह्यातील अपूर्वा वाकोडे या ध्येयवेड्या मुलीने घरची परिस्थिती हालाखीची असतांना यश मिळून दाखवून दिलं  आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने पोलीस दलात यश मिळवलं आहे. वडिल मृत्यूच्या दारात असताना अपूर्वानं पुणे पोलीस भरतीची परीक्षा दिली. यामध्ये तिची पोलिस कॉन्स्टेबल म्हणून पुणे येथे निवड झाली आहे. घरची परिस्थिती बिकट अपूर्वा वाकोडे ही नाशिक जिल्ह्यातील ओझर गावची रहिवासी आहे. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये अपूर्वा वाढली. अपूर्वाची आई दुसऱ्यांच्या घरी धूनीभांडी करते. वडील मिळेल ते काम करायचे भाऊ मिळेल ते काम करतो. त्यामुळे घरची परीस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे त्यांनी एका पत्र्याच्या खोलीत संसार थाटलेला आहे. परिस्थिती नाजूक असल्यामुळे अपूर्वा आईला कामात मदत करायची. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कसबस अपूर्वानं पूर्ण केलं. या सर्व परिस्थितीत तिला नेहमी वाटायचं की आपण काही तरी करून दाखवलं पाहिजे. एखाद्या क्षेत्रात यश मिळवलं तर आपल्या आई वडिलांना हातभार लागेल. त्यामुळे ती प्रयत्न करायची आणि नंतर ठरवल की पोलीस दलात दाखल व्हायचं म्हणजे व्हायचं आणि ती याचं जिद्दीच्या जोरावर पुणे पोलीस दलात मुलींमध्ये प्रथम आली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    वडिलांची तब्येत ठीक नसताना दिली परीक्षा  पोलीस होण्यासाठी लागेल ते कष्ट उपसण्याची तयारी मी ठेवली होती. खूप मेहनत घ्यायची सराव करायची पण एक दोन वेळा मला अपयश आले. पण मी खचले नाही. सराव चालूच ठेवला पुन्हा पोलीस भरती निघाली मी फॉर्म भरला ज्या दिवशी लेखी परीक्षा होती. त्याच दिवशी वडिलांची तब्येत जास्त खालावली त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केलं. ते बेशुद्ध होते माझ्या मनाची घालमेल होत होती काय करावं काहीच समजत नव्हत अशा परिस्थितीत मी परीक्षा देण्यासाठी गेले. मनावर दगड ठेवून पेपर दिला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळच होत घरी आली आणि बघते तर वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता. वडिलांच छत्र हरपलं मला असह्य झालं होत. माझ्या अश्रूंचा बांध फुटला पण समोर आईचा चेहरा दिसत होता. तिचे कष्ट दिसत होते. अखेर मन जड करून सर्व आटपून पुन्हा सावरले. या भरतीचा निकाल नुकताच आला त्यात मी पुणे पोलीस दलात मुलींमध्ये प्रथम आली हे बघून खुल आनंद झाला. पण कुठ तरी मनात दुःख होत की आपलं हे यश बघण्यासाठी वडील हवे होते. त्यांना ही खुप आनंद झाला असता,अशी प्रतिक्रिया अपूर्वा वाकोडेने दिली.

    आईनं दागिने गहाण ठेवून दिले शिक्षणाला पैसे, शेतकऱ्याची लेक झाली वनाधिकारी, पाहा Video

    लेकीच यश सांगताना आईला अश्रू अनावर तिने खूप मेहनत घेतली आहे. गरीब परिस्थिती असताना तिने मेहनत घेतली अभ्यास केला आणि आज ती पोलीस झाली हे बघून आनंद झाला. तिचे वडील सोडून गेले पण ती खचली नाही. सतत अभ्यास करत राहिली अशी प्रतिक्रिया आई सविता वाकोडे यांनी दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात