जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जळगाव पुन्हा हादरलं, खंडणीची मागणी, वाळू व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार

जळगाव पुन्हा हादरलं, खंडणीची मागणी, वाळू व्यावसायिकाच्या घराबाहेर गोळीबार

जळगाव गोळीबार

जळगाव गोळीबार

जळगावात काही दिवसांपूर्वीच भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 27 जुलै : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अनैतिक संबंधांतून आत्महत्या, खून तसेच बलात्काराच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात पुन्हा गोळीबार झाला आहे. भर वस्तीत गोळीबाराने शहर हादरले आहे. खंणीची मागणी करत टोळक्याने हा गोळीबार केला. या घटनेने जळगाव शहर हादरले आहे. नेमकं काय घडलं - वाळू व्यावसायिकाकडून खंडणीची मागणी करत टोळक्याने हैदोस घालत गोळीबार केलाा. ही घटना आज रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात काही दिवसांपूर्वीच भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. ही खळबळ शांत होत नाही तोच आज शहरात नव्याने गोळीबाराची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, जळगाव शहरातील के. सी. पार्क परिसरात रात्री 9 सुमारास फायरिंग झाली. शहरातील ममुराबाद रोडवर के. सी. पार्क नावाने कॉलनी असून यात शुभम माने हा वाळू व्यावसायिक राहतो. आज रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर टोळक्याने धुडगूस घालत त्याला खंडणी मागितली. त्याला वरच्या मजल्यावरून खाली बोलावण्यात आले. मात्र, तो समोर न आल्याने टोळक्याने खालूनच एकदा गोळीबार केला. यानंतर यातील काही जणांनी वरच्या मजल्यावर येऊन त्यांच्या दरवाजावर दगडफेक करतांनाच पुन्हा गोळीबार केला. अशा प्रकारे या टोळक्याने दोन-तीन फैरी झाडल्या. यानंतर शुभम माने यांना धमकावत या टोळीने तेथून पलायन केले. दरम्यान या संदर्भात मयूर माने यांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळक्यामध्ये लखन उर्फ गोलू मराठे, लखन शिंदे, नरेश शिंदे, बंटी बांदल, पवन गावढे, केयूर पंधारे आदींसह अन्य आठ-दहा जणांचा समावेश होता. या संदर्भात त्यांनी शहर पोलीस स्थानकात प्राथमिक तक्रार दिली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात