विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक, 14 एप्रिल : बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर नाशिक वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आत्तापर्यंत जवळपास 54 दुचाकीस्वारांना दंड ठोठावत पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे आता गाड्यांचे सायलेन्सर मॉडीफाय करन महागात पडणार आहे. कारवाई करण्याचे आदेश शहरात अनेकांनी आपल्या दुचाकीचे सायलेन्सर मॉडीफाय केलं आहे. यामुळे गाडी चालू असताना मोठा आवाज होतो. मात्र, हा आवाज घातक आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जास्त सहभाग आहे. मात्र, यामुळे शाळा, हॉस्पिटल तसेच इतर कार्यालयातील नागरिकांना रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना जास्त त्रास होत आहे. हे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ आशा वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस स्टेशनला दिले आहेत.
सायलेन्सर मॉडीफाय करणं पडणार महागात गंगापूर पोलिसांनी जवळपास 54 दुचाकी चालकांवर कारवाई केली आहे. यामध्ये सर्वच बुलेटचे सायलेन्सर मॉडीफाय करून जास्त आवाजाचे सायलेन्सर टाकण्यात आले आहे. या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करत काही दुचाकी या पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुलेटचे सायलेन्सर मॉडीफाय करणं तुम्हाला महागात पडणार आहे. अडीच लाख रुपयांचा दंड वसूल ‘ज्या प्रकारचं तुम्ही बुलेटचे सायलेन्सर मॉडीफाय केलेला आहे. त्या प्रकारचा दंड आकारण्यात येत आहे. आता जवळपास 54 दुचाकी चालकांकडून अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आगामी काळात जर दुचाकी चालकांनी पोलिसांचे ऐकलं नाही तर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील’, अशी माहिती गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी दिली आहे.
अवकाळी पावसाचा नाशिकला तडाखा, होत्याचं नव्हतं झाल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश! Video
तात्काळ काढून टाका ‘दुचाकी चालकांनी नागरिकांना विनाकारण वेठीस धरू नये. जास्त आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होऊन विनाकारांन इतरांना त्रास होतो. त्यामुळे कारवाईची ही मोहीम नाशिक शहरात कायम सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी असे मोडीफाय सायलेन्सर केले असतील त्यांनी आत्ताच ते काढून टाका अन्यथा दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल किंवा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो’, असंही रियाज शेख यांनी सांगितले.

)







