Home /News /maharashtra /

Cooking Oil : भेसळयुक्त तेलापेक्षा लाकडी घाण्यावरचं तेल कधीही चांगलंंच; त्यामुळे 'या' नाशिककराचा VIDEO तुम्हाला पाहावाच लागतोय

Cooking Oil : भेसळयुक्त तेलापेक्षा लाकडी घाण्यावरचं तेल कधीही चांगलंंच; त्यामुळे 'या' नाशिककराचा VIDEO तुम्हाला पाहावाच लागतोय

नाशिकमध्ये

नाशिकमध्ये लाकडी घाण्याच्या तेलाला नाशिककरांची भरघोस पसंती..

बाजारातील खाद्य तेल (Cooking Oil) हे भेसळयुक्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होतात. या नवा चांगला पर्याय जयराम पुरी आणि रोशनी पुरी या दाम्पत्याने लाकडी घाण्याच्या तेलाचा (Wood Pressing Oil) प्रयोग सुरु केलाय आणि त्याला नाशिककरांनी मोठी पसंती दर्शवली.

पुढे वाचा ...
    नाशिक, 4 जून : सद्या बाजारात खाद्य तेल (Cooking Oil) हे भेसळयुक्त मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. हेच भेसळयुक्त तेल आपल्या शरीरात गेलं तर आपल्याला विविध आजार होतात. दरोजच्या खाण्यातील तेल आपण किती शुद्ध खातो हे महत्वाचं असत. त्याचा विचार करून नाशिक शहरात जयराम पुरी आणि त्यांच्या पत्नी रोशनी पुरी यांनी लाकडी घाण्याच्या तेलाचा (Wood Pressing Oil) प्रयोग सुरू केला केला आहे. न्युट्रिशन व्हॅल्यू (Nutrition Value) जास्त असलेल्या या लाकडी घाण्यावरच्या तेलाला नाशिककरांची चांगलीच पसंती मिळत आहे. जयराम पुरी यांनी भेसळयुक्त तेलाला पर्याय म्हणून लाकडी घाण्याच्या तेलाचा प्रयोग सुरू केला आहे. लाकडी घाण्याचे तेल (cold press oil) हे तेल 35 ते 40 अंश सेल्सिअसमध्ये तयार होत. त्यामुळे या तेलातील न्युट्रिशनल व्हॅल्यू वाढते आणि त्याच्या फायदा आपल्या शरीराला होतो. यासंदर्भात माहिती देताना जयराम पुरी म्हणाले की, "जे तेल बाजारात आपल्याला मिळत ते तेल रिफाइंड तेल असतं. हे रिफाइंड तेल 200 ते 250 अंश सेल्सिअसमध्ये तयार होतं. त्यामुळे यातून न्युट्रिशनल व्हॅल्यू  मिळत नाहीत. आणि हे तेल त्यामुळे शरीराला घातक असल्याचं अनेक वेळा आपल्याला डॉक्टरांकडून सांगण्यात येतं. सद्या बाजारात खाद्य तेल हे भेसळयुक्त मिळत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. हेच भेसळयुक्त तेल आपल्या शरीरात गेलं तर आपल्याला विविध आजार होतात. दरोजच्या खाण्यातील तेल आपण किती शुद्ध खातो हे महत्वाचं असत." जयराम पुरींकडे 10 प्रकारचे तेल उपलब्ध "रिफाइंड तेलावर अधिक प्रक्रिया केलेल्या असतात. त्यात विविध प्रकारचे केमिकल्स वापरलेली असतात. त्यामुळेच ते फक्त काही काळच टिकू शकतं. मात्र लाकडी घाण्याचे तेल हे अवघ्या 3 ते 4 महिने टिकतं. कारण, त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नसतं", अशी माहिती जयराम पुरी यांनी दिली. जयराम पुरी हे लाकडी घाण्यातून जवळपास १० प्रकारचे तेल काढतात. त्यात सोयाबीन, खोबरं, जवस, तीळ, सूर्यफुल, शेंगदाणा, करडई यांचा समावेश आहे. लाकडी घाण्याचे खाद्यतेल तुम्हाला रिफाइंड तेलापेक्षा काही प्रमाणात महाग पडतं, मात्र ते शरीरासाठी चांगले असतं. वाचा : शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का? नाशिकमध्ये तयार होणाऱ्या या लाकडी घाण्याच्या तेलाला नशिकमध्येच नाही, तर विदेशातून ही मागणी होत आहे. त्यांचं हे तेल केमिकल्स विरहित असल्याने अनेकजण आपल्या खाण्यात या तेलाचा वापर करतात. ऑनलाईन पद्धतीनेही ते आपल्या तेलाची विक्रीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आपल्याला जर हे लाकडी घाण्याचे तेल घ्यायचे असेल, तर आपण घर बसल्या ठिकाणी हे तेल मागवू शकता. www.ecosureoils.com या त्यांच्या वेबसाईटवर आपल्या अधिक माहिती मिळेल.
    First published:

    पुढील बातम्या