Home /News /maharashtra /

Nashik Special Report : पोलिसांची नोकरी सोडून 'तो' इस्त्राईली शेतीकडे वळला, आता आंब्याच्या शेतीतून घेतोय इतकं उपन्न

Nashik Special Report : पोलिसांची नोकरी सोडून 'तो' इस्त्राईली शेतीकडे वळला, आता आंब्याच्या शेतीतून घेतोय इतकं उपन्न

नितीन

नितीन भोये, नाशिक.

2014 साली पोलिसाची नोकरी नाकारत नाशिकच्या नितीन भोयेने इस्त्राईली शेतीकडे वळला. विविध प्रकारच्या आंब्याची शेती करू लागला. सध्या त्यांचं उत्पन्न टनात निघतंय. त्याचा माल परदेशातही निर्यात होऊ लागला आहे.

    नाशिक, 21 जून : आजकाल शेती करणं फारसं कोणालाही आवडत नाही. कारण, शेतीतून मिळणार उत्पन्न हे अनेकांना तुटपुंज वाटतं. शेतीत परवडत नाही, मालाला चांगला भाव मिळत नाही, अशी अनेकांची ओरड असते. अशा परिस्शिती असतानाही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथील नितीन भोये (Farmer Nitin Bhoye in Nashik) या तरुणाने अनेकांना आदर्शवत अशी इस्त्राईली पद्धतीची आंब्याची शेती (israel mango farming) तयार केली आहे. नितीन भोये हा 2014 मध्ये पोलीस दलात भरती झाला. मित्र सांगायचे की, नोकरी केली तर आपल्याला चांगला पैसा मिळतो. त्यामुळे नितीन हा नोकरीच्या मागे लागला. मात्र, पोलीस दलात भरती होऊनदेखील नितीनला नोकरी करावं असं वाटत नव्हतं. कारण, आपण शेतीत चांगल काही तरी करू शकतो म्हणून त्याचं मन त्याला सतावत होतं. त्याच मनही शेतीत लागत नव्हतं. वाचा : Success Story : स्पर्धा परीक्षा सोडली! आता ‘हा’ पठ्ठ्या हाॅटेल व्यवसायात कमवतो महिना 80 हजार, पहा VIDEO शेवटी नोकरी सोडून शेती करायचं नितीनने ठरवलं. मात्र, शेती करायची तर ती आधुनिक पद्धतीनेच करायची अशी नितीनची जिद्द होती. मित्राच्या मदतीने इस्त्राईल पद्धतीने आंब्याची शेती सुरू केली. नितीनने आपल्या मित्राच्या मदतीने सद्या 5 एकरवर विविध प्रजातीच्या आंब्याची लागवड केली आहे. त्यात मालिका, हिमसागर, गोवामानकूर, ऑस्टिन, लिली यासारख्या आंब्याच्या प्रजातींची लागवड केली आहे. दरवर्षी हे आंबे विदेशात एक्सपोर्ट करून नितीन चांगलं उत्पन्न कमवतो. तसेच आंब्यांबरोबर त्यांनी चिकू, नारळ या फळांचीही लागवड केली आहे. हा तरुण शेती तर करतोच, मात्र याबरोबरच आपल्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना आंब्याच्या शेतीच प्रशिक्षण देखील देत असतो. यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला पर्याय मिळत आहे. त्यामुळे शेतीत परवडत नाही म्हणणंदेखील या तरुणाने चुकीचं ठरवलं आहे. आपण नवीन तंत्रज्ञान वापरून चांगल काम केलं तर नक्कीच शेतीत नफा मिळतो, हे नितीनने दाखवून दिलं आहे. वाचा : Success Story: तब्बल 7.5 कोटींचं पॅकेज धुडकावून सुरू केलं कोचिंग; आज बनलीय देशातील युनिकॉर्न कंपनी नितीनने इस्त्राईली शेतीच केली नाही तर, त्याचबरोबर त्यानं प्रशिक्षण केंद्रही सुरू केलं आहे. इस्त्राईल व जर्मन तंत्रज्ञानाची फळबाग शेती प्रशिक्षण केंद्र, असं त्याचं नाव आहे. चिंचवड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक या पत्त्यावर त्याचं हे केंद्र आहे. त्याच्याशी 7875536465 किंवा 7666001068 या क्रमांवरही संपर्क करू शकता.
    First published:

    Tags: Agriculture, Maharashtra News, जॉब

    पुढील बातम्या