मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तमाशामध्ये गायलं गाणं आणि पोहोचला इंडियन आयडलच्या स्टेजवर, ऋषिकेशची अशीही कहाणी

तमाशामध्ये गायलं गाणं आणि पोहोचला इंडियन आयडलच्या स्टेजवर, ऋषिकेशची अशीही कहाणी

X
ऋषिकेश

ऋषिकेश हा उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपास आला आहे. त्याचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.

ऋषिकेश हा उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपास आला आहे. त्याचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.

विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी

नाशिक, 16 मे : आयुष्याला कोणत्या वळणावर कलाटणी बसेल आणि आपण कधी मोठ्या उंचीवर जाऊ हे सांगता येत नाही. नाशिक जिल्ह्यातील ऋषिकेश शेलार याच्या बाबतीत असंच काहीस घडलेलं आहे. वडांगळी गावच्या यात्रेत आलेल्या तमाशातील गायक अचानकपणे झिंगाट झाल्याने त्याच्या जागेवर वगनाट्य म्हणायला ऋषिकेशला उभे करण्यात आले. ऋषिकेशने अतिशय उत्कृष्ट गायन केलं आणि खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याला इथेच कलाटणी बसली. ऋषिकेश हा आता उत्कृष्ट गायक आणि संगीतकार म्हणून नावारूपास आला आहे.

छोट्याशा प्रसंगाने आयुष्याला बसली कलाटणी

ऋषिकेश शेलार हा मूळचा सिन्नर तालुक्यातील निमगाव देवपूरचा रहिवासी आहे. आई-वडील शेती करतात. त्यामुळे ऋषिकेशला गायनाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मात्र, त्याच्या अंगात जिद्द आणि चिकाटी होती. आई वडिलांना शेतात काम करू लागायच मदत करायची आणि मिळेल त्या वेळेत संगीताचा सराव करायचा अशा ऋषिकेशचा दिनक्रम होता. मात्र हे सर्व करत असताना तो मागे हटला नाही आपला सराव सुरूच ठेवला.

शाळेत असताना मी तमाशातील वगनाट्य पाठ केलं होतं. एकदा वडांगळी गावच्या यात्रेत तमाशा आला होता. तमाशा सुरूच होत नव्हता. म्हणून गावकऱ्यांनी विचारणा केली असता बघितले तर तमाशातील गायक अचानकपणे झिंगाट होता. तेव्हा काही गावकऱ्यांनी माझे नाव पुढे केले. ऋषिकेश चांगल वगनाट्य गावू शकतो,असे ते म्हणत होते. अखेर मी पण मागे पुढे न बघता स्टेजवर गेलो आणि पाठ केलेल वगनाट्य गायला सुरुवात केली.

बघतो तर काय लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मला प्रोत्साहन मिळालं. मग अजून चांगल्या वरच्या आवाजात गायलं. सर्वांनी भरभरून कौतुक केलं आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात हाच टर्निंग पॉइंट ठरला. मला याच वेळी जाणीव झाली की मी काही तरी करू शकतो. त्यामुळे मी गायला सुरूवात केली त्यानंतर अनेक मोठ्या स्टेजवर मी गायन केलं. इंडीयन आयडॉल मराठी सारख्या स्टेजवर देखील मी बक्षीस मिळवली. अजय अतुल यांनी देखील माझ कौतुक करत शाबासकीची थाप दिली. एका शेतकरी कुटुंबातील मुलाने इतका छान परफॉर्मन्स करण त्यांच्यासाठी देखील आश्चर्याचा धक्का होता. यानंतर गावातील नागरिकांना मला जणू डोक्यावर घेतलं. भरभरून कौतुक केलं अशी प्रतिक्रिया गायक ऋषिकेश शेलार याने दिली आहे.

Wardha News: शाळेत गाणं गायलं आणि पुढं आयुष्यच बदललं, आर्षचा संगितमय प्रवास, तुम्हालाही वाटेल कौतुक, Video

जाणीव होऊनही गायनाला उशीर झाला

अगोदर संगीताचे शिक्षण कुठे घ्यावं हे माहीत नव्हतं. त्यामुळे त्यात बराच कालावधी गेला. नंतर वडांगळीचे संगीत शिक्षक गणेश डोकबाने यांनी प्रथम संगीताची माहिती दिली. त्या आधारे लासलगाव येथील बाबासाहेब चव्हाण यांच्याकडे गायन, संगीताचे धडे गिरवायला लागलो. आता पंडित प्रसाद खापर्डी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवत आहे, असंही ऋषिकेश शेलार याने सांगितले.

First published:
top videos

    Tags: Local18, Nashik