मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : नाशिकच्या शेतकऱ्यानं राबवला इस्रायलचा पॅटर्न; होतीय लाखोंची कमाई, पाहा VIDEO

Nashik : नाशिकच्या शेतकऱ्यानं राबवला इस्रायलचा पॅटर्न; होतीय लाखोंची कमाई, पाहा VIDEO

नाशिक शहरातील शेतकरी संतोष सोनवणे यांनी बायोफ्लॉक इस्राईल पद्धतीने मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे.

नाशिक 17 ऑगस्ट : सध्या शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय करण्याकडे अनेकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे शेतीपूरक व्यवसायातून ( Farmer ) लाखों रुपये उत्पन्न देखील शेतकऱ्यांना ( Farmers ) मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेती पूरक व्यवसाय करत आहेत. नाशिक शहरातील शेतकरी संतोष सोनवणे यांनीही शेतीला जोड धंदा म्हणून मत्स्यपालन व्यवसाय ( Fish ) सुरू केला असून यामधून त्यांना चांगली कमाई सुद्धा होत आहे. चला तर मग त्यांच्या या मत्स्यपालन व्यवसायाबद्दल जाणून घेऊया. 

नाशिक शहरातील शेतकरी संतोष सोनवणे यांनी बायोफ्लॉक इस्राईल पद्धतीने मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांचा हा आधुनिक पद्धतीने केलेला व्यवसाय यशस्वी देखील झाला आहे. प्रथमतः त्यांनी या व्यवसायाबाबत प्रशिक्षण घेतलं सर्व समजून घेतल आणि त्यानंतर दिंडोरीरोडला म्हसरूळच्या पुढे जुन्या जकात नाक्याच्या अलीकडे त्यांनी मत्स्यपालन व्यवसाय आपल्या शेतात सुरू केला आहे. या मत्स्यपालन व्यवसायातून त्यांना सहा महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतात.

हेही वाचा-  Osmanabad : शेतकऱ्यांवरील संकटे संपता संपेना…; अतिवृष्टी, गोगलगाय आणि आता ‘यलो मोझॅक’

कमी जागेत चांगला व्यवसाय

संतोष सोनवणे यांनी शेतात पाच आधुनिक टँक तयार केले आहेत. ते पूर्णतः इस्राईल टेक्नॉलॉजीचे आहेत. इस्राईल टेक्नॉलॉजीचा वापर केला तर मत्स्यव्यवसायासाठी खूप जागा लागत नाही. कमी जागेत आपण मत्स्यव्यवसाय सुरू करू शकतो. सहा महिन्यांनी त्यांची एक बॅच निघते. फक्त जे बीज आपण टाकतो ते चांगल्या प्रकारचे असायला हवे त्यात ही प्रकार असतात. लो व्हॅल्यू फिश, हाय व्हॅल्यू फिश, त्यातील तीलापे, रूपचंदा या प्रजातींचे मासे चांगले असतात. त्यांचं वजन लवकर वाढत सहा महिन्यात ते विक्री योग्य होतात. तसेच एक व्यक्ती दहा टँक सांभाळू शकतो. त्याला जास्त कामगारांची गरज नसते. टँक मध्ये असल्यामुळे माशांना ऑक्सिजन देणे त्यांना खाणे देणे हेच काम असत आणि वेळोवेळी या गोष्टी पुरवल्या की मासे चांगले असतात.

शेतीला जोड व्यवसाय मत्स्यपालन 

मत्स्यपालनातून आपल्याला चांगला नफा मिळतो. साधारणतः सात ते आठ लाखांच्या गुंतवणुकीतून सहा महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतात. फक्त मत्स्यपालन सुरू करताना त्याचा अभ्यास पूर्ण करा त्याची माहिती जाणून घ्या. नक्कीच यश मिळू शकत आपण शेती सोबतच हा जोड व्यवसाय चांगला करू शकतो, असे शेतकरी संतोष सोनवणे यांनी सांगितले.

हेही वाचा- Osmanabad : ऐतिहासिक वारसा आणि दारूगोळ्याचे भंडार असलेला परांडा किल्ला

गुगल मॅप वरून साभार

इस्राईल पद्धतीने मत्स्यपालन करण्यासाठी मिळेल प्रशिक्षण

हा व्यवसाय कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी देखील या व्यवसायाकडे वळल पाहिजे. यासंदर्भात आधुनिक पद्धतीने कसे  काम करायचं याबात आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण देतो तसेच पूर्ण प्रोजेक्ट उभारण्यापर्यंत आम्ही मदत करतो, अशी माहिती शेतकरी संतोष सोनवणे यांनी दिली आहे.

दिंडोरीरोड म्हसरूळच्या पुढे जुन्या जकात नाक्याच्या अलीकडे बायोफ्लॉक फिश फार्म आहे. याठिकाणी भेट देऊन तुम्ही मत्स्यपालन व्यवसायासंदर्भात प्रशिक्षण घेऊ शकता किंवा 73786 35614 यावर संपर्क करून मत्स्यपालन व्यवसायासंदर्भात माहिती घेऊ शकता. 

First published:

Tags: Farmer, Nashik