जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : नाशिककराच्या वैतागाचा उद्रेक, प्रशासनाला जागं करण्यासाठी खड्ड्यांचं घातलं श्राद्ध!

Nashik : नाशिककराच्या वैतागाचा उद्रेक, प्रशासनाला जागं करण्यासाठी खड्ड्यांचं घातलं श्राद्ध!

वैतागलेल्या नाशिककराने चक्क रस्त्याचं श्राद्ध घातले.

वैतागलेल्या नाशिककराने चक्क रस्त्याचं श्राद्ध घातले.

ज्या रस्त्यांवर खड्डे (Pothole in Nashik) आहेत.त्या ठिकाणी झोपून,बसून वाहन चालकांना खड्ड्यांविरोधात आवाज उठवण्यासंदर्भात आवाहन केलं,तसेच खड्ड्यांचं श्राद्ध घातलं

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक 7 सप्टेंबर : नाशिक शहरातील बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.मात्र त्याकडे महानगरपालिका प्रशासन लक्ष देत नाहीये,त्यामुळे नाशिकचे सामाजिक कार्येकर्ते सचिन अहिरे यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक आगळंवेगळं आंदोलन केलं. त्यांनी बुधवारी चक्क ज्या रस्त्यांवर खड्डे (Pothole in Nashik) आहेत. त्या ठिकाणी झोपून,बसून वाहन चालकांना खड्ड्यांविरोधात आवाज उठवण्यासंदर्भात आवाहन केलं. तसेच खड्ड्यांचं श्राद्ध देखील घातलं.त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची  सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत.ज्यामुळे आतापर्यंत अनेक वाहन चालकांचा अपघात होऊन ते जखमी झाले आहेत.तर काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरू अशी ग्वाही दिली होती.त्यात काही रस्त्यांवरील खड्डे अद्यापही भरले नाहीत,विशेष म्हणजे खड्डे भरले जातात मात्र चार दिवस होत नाही तर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास होत आहे.

    News18

    खड्डे भरण्यासाठी माती वापरली जात असल्याचा आरोप सचिन अहिरे यांनी केला आहे.पंचवटी परिसरात त्यांनी हे आंदोलन केलं,तसेच सर्वच परिसरातील खड्डे जोपर्यंत व्यवस्थित बुजवले जात नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरूच राहिल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. गणपती बाप्पा सांगतो मतदान करा… मोठ्या त्रुटीवरही ठेवलं बोट VIDEO … म्हणून उचललं पाऊल! रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात अनेक वेळा विविध मार्गाने आंदोलन केली.मनपा प्रशासनाला ही जाब विचारला,स्थानिक लोकप्रतिनिधीना ही सांगितल मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही.त्यामुळे अखेर रस्त्यांवरील खड्ड्यांजवळ झोपून श्राद्ध घालण्याची वेळ आली आहे. ज्याचा घरचा माणूस जातो त्यालाच याची खरी किंमत कळते.इतरांना त्याची काही जाणीव नसते,त्यामुळे खड्डे तात्काळ बुजवा अशी मागणी अहिरे यांनी केली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: nashik
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात