मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशिककरांच्या हाताला मिळणार काम! 'मोबाईल रिपेअरिंग'च्या मोफत कोर्सबद्दलचा, वाचा SPECIAL REPORT

नाशिककरांच्या हाताला मिळणार काम! 'मोबाईल रिपेअरिंग'च्या मोफत कोर्सबद्दलचा, वाचा SPECIAL REPORT

X
स्वामी

स्वामी विवेकानंद इन्स्टिट्युट कडून मोबाईल रीपेअरिंगचे मिळणार मोफत प्रशिक्षण 

नाशिकमध्ये होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद इन्स्टिट्युटमध्ये मोबाईल रिपेअरिंग (Mobile repairing) कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

   नाशिक, 13 जून : श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचलित विवेकानंद इन्स्टिट्युटमध्ये मोबाईल रिपेअरिंग (Mobile repairing) कोर्सचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर नोकरीची संधी मिळावी, यासाठी या इन्स्टिट्युटकडून 'मोबाईल रिपेअरिंग' कोर्स मोफत (Mobile repairing course in Nashik) शिकविला जाणर आहे. या कोर्ससंदर्भातून अधिक माहिती जाणून घेऊया..

  कुठे शिकवला जाणार हा कोर्स?

  'मोबाईल रिपेअरिंग' हा नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी मेहेर सिग्नलजवळ इंडियन बँकेजवळ अनंत गौरव चेंबर तिसऱ्यावर सुरू असून चौकशीसाठी 7588188061/7588188062 या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधू शकतात.

  गुगल मॅपवरून साभार...

  विद्यार्थ्यांची मर्यादा किती आहे?

  या प्रशिक्षणामध्ये एक बॅच असणार आहे. त्यात 30 विद्यार्थी असतील. एक बॅच पूर्ण झाल्यास तात्काळ दुसरी बॅच सुरू केली जाणार आहे. म्हणजेत एका बॅचमध्ये एकूण 30 विद्यार्थी प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी हा 3 महिन्यांचा आहे आणि दररोज २ तास प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत?

  1) पूर्णतः मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  2) कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

  3) स्वयंरोजगार निर्मिती संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे.

  वाचा : Aurangabad : हाय सॅलरीसाठी BAMU मधील ‘या’ विभागाचे कोर्सेस माहितीच असेल पाहिजे, पहा सविस्तर VIDEO

  या कोर्ससाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  1) आधारकार्ड झेरॉक्सची 1 प्रत

  २) पासपोर्ट साईज 2 फोटो

  ३) 8 वी पास शाळेच्या दाखल्याची 1 झेरॉक्स

  ४) वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे इतकी आहे.

  First published:
  top videos