जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंच्या माणसाने शिंदेंच्या शिलेदारांचा केला करेक्ट कार्यक्रम, मालेगावात चारली धूळ

उद्धव ठाकरेंच्या माणसाने शिंदेंच्या शिलेदारांचा केला करेक्ट कार्यक्रम, मालेगावात चारली धूळ

पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का

पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का

मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

बब्बू शेख, प्रतिनिधी मालेगाव, 29 एप्रिल : बाजार समितीच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातचं नव्हे तर राज्यभरातील जनता आणि राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे लक्ष लागलेल्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल अत्यंत धक्कादायक लागला आहे. येथे ठाकरे गटाचे उपनेते अद्वये हिरे यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारत 18 पैकी 17 जागावर दणदणीत विजय मिळवत बाजार समितीत स्पष्ट बहुतम मिळविले. पालकमंत्री दादा भुसे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून त्यांना फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. भुसे यांना हा जोर का झटका धीरे से लगे मानला जात आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच हिरे समर्थकांनी एकच जल्लोष केला. हा जनतेचा कौल असून आगामी काळात हाच कौल जनता सर्व निवडणुकीत देईल असा विश्वास अद्वये हिरे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री दादा भुसे यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यादृष्टीने त्यांनी विविध डावपेचांचा वापर करीत हिरे यांच्यावर दडपण आणले होते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे भुसे विरूद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते हिरे यांच्यात ही सरळ लढत होती. त्यात 18 जागापैकी 17 जागांवर हिरे गटाने विजय मिळवत भुसे यांचा पराभव केला आहे. नाशिक जिल्ह्यात मविआची मुसंडी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 28 एप्रिल रोजी झालेल्या मालेगाव, येवला, लासलगाव आणि चांदवड या बाजार समितीच्या निवडणुकीचीं आज मतमोजणी करण्यात आली. त्यात सर्वात जास्त धक्कादायक निकाल मालेगाव बाजार समितीचा लागला. येथे पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का देत ठाकरे गटाचे उपनेते अद्वये हिरे यांच्या पॅनल ने 18 पैकी 17 जागा मिळवून सत्ता काबीज केली तर तिकडे चांदवडला भाजपचीं पीछेहाट होऊन महाविकास आघाडीने बाजी मारली. चांदवडला भाजप आमदार यांच्या पॅनलला केवळ 7 जागा मिळाल्या तर माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या पॅनलने 10 जागा जिंकल्या एक जागा अपक्षाच्या खात्यात गेली. वाचा - बीड जिल्ह्यात आघाडीचा युतीला दे धक्का! भावाचा बहिणीला तर काकाचा पुतण्याला छोबीपछाड येवल्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या पॅनलने बाजी मारत 18 पैकी 13 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. आशिया खंडात कांद्याची मोठी बाजार पेठ मानली जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पॅनल समोरा समोर होते त्यात एक पंढरीनाथ थोरे यांचा पॅनल हा अजितदादा पवार समर्थकांचा तर दुसरा जयदत्त होळकर यांचा पॅनल छगन भुजबळ यांच्या समर्थकांचा मानला जातो येथे थोरे पॅनलने 9 जागा जिंकल्या तर होळकर यांच्या पॅनलला 8 जागा मिळाल्या आहे एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे. बहुमतासाठी 10 जागा लागतात जर अपक्ष उमेदवार थोरे गटात जाऊन बसला तर त्यांचे बहुमत होईल आणि जर होळकर गटाला पाठिंबा दिला तर दोन्ही गटाकडे समसमान 9/9 जागा होतील त्यामुळे लासलगाव बाजार समितीवर कोणाची सत्ता येईल याकडे लक्ष लागणार आहे. निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती निकाल जाहीर होताच एकच जल्लोष करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात