नाशिक, 1 जून : जगभरात कुसुमाग्रज प्रतिष्ठान
(Kusumagraj Pratishthan) मागील 13 वर्षांपासून कार्यरत आहे. 'ग्रंथ तुमच्या दारी' या उपक्रमांतर्गंत वाचकांपर्यंत मराठीतील सर्वोत्तम साहित्य (Marathi literature) पोहोचविण्यासाठी काही ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली जाते. या वाचनप्रिय योजनेंतर्गत भारत आणि जगभरातील 15 देशांमध्ये सुमारे अडीच कोटींहून अधिक किमतीची पुस्तके
(Marathi Books) फिरत्या ग्रंथ पेट्यांच्या स्वरुपात देण्यात आली आहेत.
ऑस्ट्रेलियातील
(Australia) ब्रिस्बेन येथे वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक श्रुती आणि तुषार काळवीट हे वाचनप्रेमी दाम्पत्याने 'ग्रंथ तुमच्या दारी' हा उपक्रम समजावून घेण्यासाठी कुसुमाग्रज स्मारकास भेट दिली. त्यांनी या उपक्रमाचे प्रवर्तक विनायक रानडे यांची भेट घेतली. भेटी दरम्यान उपक्रमाची सविस्तर माहिती आणि वाचनासाठी सर्वोत्तम असणाऱ्या पुस्तकांची माहिती घेतली.
वाचा : VIDEO: अभिनेत्री उर्मिला निंबाळकरला टेबलाखाली भेटली एक गोड, गोंडस व्यक्ती; पाहून प्रेमात पडाल
या दाम्पत्याने ब्रिस्बेन येथील मराठी साहित्याची रुची असणाऱ्या वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी पुढाकार घेतला. त्यातून ब्रिस्बेन येथील 16 वाचक कुटुंबानी देणगी रूपाने आर्थिक पाठबळ देऊन सक्रिय सहभाग नोंदवला. श्रुती काळवीट, समन्वयक ब्रिस्बेन यांच्या पुढाकाराने 21 ग्रंथ पेट्या ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे रवाना झाल्या आहेत. यासाठी अंजली घुर्ये यांनी 'ओ-झेड' किराणा या उद्योग समुहाद्वारे ग्रंथ पेट्या ब्रिस्बेन येथे पोहोचविण्यासाठी सहकार्य केले.
ब्रिस्बेनमध्ये 'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेचा होणार शुभारंभ
एका ग्रंथ पेटीत 25 पुस्तके आहेत. प्रत्येक पेटीतील पुस्तक वेगळी असतात. विविध भागात या पेट्या वाचक कुटुंबाला 3 महिन्यांसाठी उपलब्ध होतात. दर 3 महिन्यांनी पेट्या परस्परांच्यामध्ये बदलत्या ठेवल्यामुळे सर्वांना मोठ्या प्रमाणात दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत राहाते. भविष्यात जशा ग्रंथ पेट्या वाढत जातात, तेवढी विविध प्रकारची जास्तीत जास्त पुस्तके आपल्या वाचकांना उपलब्ध होतात.
भारताबाहेरही योजनेचा मोठा प्रसार
ग्रंथ तुमच्या दारी या योजनेंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 50 लाख रुपयांची ग्रंथ संपदा जमा झाली आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हास, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्येदेखील या योजनेचा शुभारंभ झाला आहे. इतकचं काय तर भारताबाहेरदेखील दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झरलॅन्ड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅनफ्रान्सिस्को, बे एरिया, लंडन, श्रीलंका, ब्रिस्बेन या देशांमध्येही या मोहिमेचा प्रचार प्रसार झाला आहे.
वाचा :
BREAKING : दादा पर्व संपलं, सौरभ गांगुलीने दिला BCCI चा राजीनामा
वाचन संस्कृतीच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला यथा योग्य देणगी द्यावी, या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद नाशिककरांसह, साहित्यप्रेमींकडून मिळत आहे. वाढदिवस, एकसष्ठी, पंच्याहत्तरी, सहस्त्र चंद्र दर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप मिळालेल्या भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट असलेल्या देणग्यांमुळे असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात, कार्यालयात, दवाखान्यात अशात्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास पुस्तके उपलब्ध होत आहेत.
या संदर्भात विनायक रानडे म्हणाले की, "जगभरात सर्व देशांमध्ये मराठी माणूस पोहोचलेला आहे. त्यांच्यासाठी पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे. जिथे मराठी शब्द आणि मराठी भाषा आहे, जिथे मराठी माणूस आहे तिथे-तिथे आमची योजना जावी अशी आमची इछा आहे. तसेच कोरोना काळात रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना पुस्तके मिळवून देण्याचं कामही या योजनेकडून करण्यात आलं आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.