विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 1 मे : आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार बांधवांप्रती सामाजिक बांधिलकी जपत कामगारांच्या व्यथा मांडणारी भव्य रांगोळी उंटवाडी रोड येथील सिटी सेंटर मॉल येथे साकारण्यात आली आहे. ही रांगोळी बघण्यासाठी नाशिक करांनी गर्दी केली आहे. भव्य रांगोळी ही रांगोळी कलाकार आसावरी धर्माधिकारी यांच्या टीमने जवळपास 18 बाय 36 आकाराची साकारली आहे. सहा कलाकारांनी सहा तासात साकारली आहे. या रांगोळीतून त्यांनी कामगारांच्या व्यथा मांडल्या आहेत. कामगार दिवसरात्र कशासाठी झगडत असतो, त्याचे प्रश्न काय असतात, त्याला कोणत्या गोष्टींसाठी जास्त झगडावं लागत हे सर्व त्यांनी या रांगोळी मधून साकारल आहे.
पिक्सल आर्टमध्ये रांगोळी आम्ही लहान लहान चौकोन काढले आहेत. त्यांचा आकार आहे एक बाय एक इंच,दोन चौकोनमध्ये एक सेंटिमीटर अंतर ठेवलं आहे. असे आम्ही 51 हजार चौकोन काढले आहेत आणि त्यातून ही भव्य रांगोळी साकारली आहे. पिक्सल आर्टमध्ये ही रांगोळी साकारली आहे. सामान्य रांगोळी पेक्षा ही रांगोळी वेगळी आहे. आम्ही यात एक व्यक्ती दाखवली आहे. जी व्यक्ती साधना करत आहे आणि त्या व्यक्तीच्या पोटात एक गोल काढला आहे. ती भाकरी आहे त्यालाच घड्याळाचे स्वरूप दिल आहे.
महाराष्ट्र दिनी समुद्रात ढोल ताशांचं वादन, त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने दुबईत रचला अनोखा विश्वविक्रम
म्हणजे पोटभर अन्न जर मिळालं तर त्या व्यक्तीची साधना होऊ शकते. एकरूप होऊ शकते म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला पोटभर अन्नाची गरज आहे. त्यातूनच त्याला ऊर्जा मिळेल. एका बाजूला डब्बा काढला आहे आणि दुसऱ्या बाजूला पैशांची पोटली काढली आहे. आम्हाला समाजाला संदेश द्यायचा आहे की कामगाराच्या किमान गरजा या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यांच्या वाहन खर्च असेल किंवा गृह कर्ज असेल मुलीचं लग्न, आरोग्य, शैक्षिणक खर्च यामध्ये कामगाराला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. मग ते सर्वच कामगार आले त्यात तुम्ही आम्ही सर्व त्यात फरक इतकाच आहे की कोणी बौद्धिक कामगार असेल तर कोणी शारीरिक कामगार असेल त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. हाच संदेश या रांगोळी मधून देण्यात आला आहे, अशी माहिती रागोळी कलाकार आसावरी धर्माधिकारी यांनी दिली आहे.