Home /News /maharashtra /

Nashik Special Report : कहाणी 'ती' च्या जिद्दीची! उसाचं गुऱ्हाळ चालवून पुरूषांनाही लाजवेल, असं करते कष्ट

Nashik Special Report : कहाणी 'ती' च्या जिद्दीची! उसाचं गुऱ्हाळ चालवून पुरूषांनाही लाजवेल, असं करते कष्ट

सरस्वती

सरस्वती आगलावे, नाशिक

आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थित नाशिकच्या सरस्वती आगलावे यांनी जिद्दीने उसाचं फिरतं गुऱ्हाळ सुरू केलं. त्यासाठी स्वतः रिक्षा शिकल्या आणि व्यवसाय यशस्वीपणे वाढविला.

    नाशिक, 15 जून : आपल्यात जर जिद्द, चिकाटी आणि धैर्य असेल तर, कोणतंही संकट असो त्यावर आपण सहजपणे मात करू शकतो. असंच एक नाशिकमधील उदाहरण समोर आलं आहे. सरस्वती आगलावे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदी नाजूक आहे, पती आणि मुलगा दोघेही मजुरी करतात. त्यामध्ये भाड्याच्या घरात राहणं आणि कुटुंब चालविणं अवघड होतं, त्यामुळे त्यांनी पदर खोचून उसाचं गुऱ्हाळ (Sugarcane Juice Business) सुरू केलं आणि पुरुषालाही लाजवेल, असं काम करून घर चालवू लागल्या आहे. (Saraswati Aglave successfully runs a Sugarcane juice business) तिघांच्या उत्पन्नात घरं चालविणं कठीण होऊन बसलं. दुसरीकडे महागाईमुळे आर्थिक चटकेही जास्त बसू लागलं. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. सरस्वती आगलावे यांनी विचार केला की, आपण अस घरात बसून, विचार करून चालणार नाही. काहीतरी उद्योग केलं तर आपल्याला दोन पैसे मिळतील. त्यांच्या मनात विचार आला की, सद्या उसाचा रस अनेक जण पितात. तो शरीराला ही चांगला असतो. त्यामुळे अनेकांची रस पिण्यास पसंती असते. त्यांनी लागलीच इकडून तिकडून थोडे पैसे जमा करून एक जुनी रिक्षा विकत घेतली. त्यावर उसाच गुऱ्हाळ मशीन बसवलं आणि कालिदास कला मंदिर परिसरात गुऱ्हाळ सुरू केलं." वाचा : Success Story : स्पर्धा परीक्षा सोडली! आता ‘हा’ पठ्ठ्या हाॅटेल व्यवसायात कमवतो महिना 80 हजार, पहा VIDEO आता ही रिक्षा दररोज कोण घरी नेणार आणि आणणार, त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहावं लागणार, त्यामुळे त्यांनी स्वतःच रिक्षा चालवायचा विचार केला आणि काही दिवसांत त्या स्वतः रिक्षा चालवायला शिकल्या. त्यांच्या या अफाट मेहनतीतून दररोजचे 700 ते 800 रुपयांची कमाई होते. त्या स्वतः दररोज रिक्षा चालवत घरी जातात. पुन्हा सकाळी गुऱ्हाळ ठिकाणी रिक्षा चालवत आणतात. त्यांची ही मेहनत बघून अनेकांना आश्चर्य वाटतं. मात्र, त्या अभिमानाने सांगतात की, "परिस्थिती कशी ही असु दे. आपल्यात काम करण्याची जिद्द असली की आपण सहज त्यावर मात करू शकतो. आज त्यांचा संसार अगदी व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे संकटाला घाबरून जाऊ नका. तोंड द्यायला शिका", असं सरस्वती आगलावे म्हणाल्या.
    First published:

    पुढील बातम्या