मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा, सासरच्या लोकांनी विधवा सूनेच्या तोंडाला फासलं काळं, गावात धिंडही काढली

पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा, सासरच्या लोकांनी विधवा सूनेच्या तोंडाला फासलं काळं, गावात धिंडही काढली

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

राजर्षी शाहू महाराजांनी देशाला पुरोगामी महाराष्ट्राचा संदेश दिला. त्याच महाराष्ट्रातील नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी 

नाशिक, 31 जानेवारी : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका विधवा महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी तोंडाला काळ फासून गळ्यात चपलांचा हार घालत गावातून धिंड काढली. आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय या महिलेने व्यक्त केला होता. हाच तिचा गुन्हा झाला की काय, असा प्रश्न या यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी देशाला पुरोगामी महाराष्ट्राचा संदेश दिला. त्याच महाराष्ट्रातील नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेला सासरच्या लोकांनी तिच्या तोंडाला काळे फासत गळ्यात चपलांचा हार घालून गावात धिंड काढली. दहा दिवसांपूर्वी या महिलेच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र, आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाला आहे, असा संशय या महिलेने दशक्रिया विधीच्या दिवशी उपस्थित केला.

याच कारणावरून या महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी तोंड काळ करून चपलाचा हार घालत गावात तिची धिंड काढली. धक्कादायक म्हणजे पडित महिलेने या प्रकरणी पोलीस ठाण्यातही धाव घेतली. मात्र, पोलिसांनी या महिलेचा गुन्हा दाखल करून न घेता तिला गुन्हा दाखल"न"करण्यासाठी दमबाजी केली.

हेही वाचा - नाशिक : मुलीच्या जन्माच्या दिवशीच बापाची आत्महत्या, सावकाराच्या जाचाने बाप, दोन मुलांनी संपवलं जीवन

दरम्यान, या घटनेची बातमी तालुक्यात पसरल्यानंतर पोलिसांनी सदर महिलेने तक्रार न देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती दिली. मात्र, पोलिसांना या प्रकरणात सु मोटो कारवाईचे अधिकार असताना पोलिसांनी सदर प्रकरणात आरोपींना पाठीशी का घातले, असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिला आहे.

नाशिकच्या चांदवड तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हणावं की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे विधवा महिलांसाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आणि त्यांच्या संरक्षणाची हमीही घेतली. मात्र, सरकारची हीच व्यवस्था पीडित महिलेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकत आहे. त्यामुळे या पीडित महिलेसमोर "कुंपणच जर शेत खात असेल तर दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न उभा राहिला आहे."

First published:

Tags: Crime news, Nashik