जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Holi 2023 : काठीच्या राजवाडी होळीत रंगले आदिवासी बांधव! 5 दिवस चालणार मोठा उत्सव, Video

Holi 2023 : काठीच्या राजवाडी होळीत रंगले आदिवासी बांधव! 5 दिवस चालणार मोठा उत्सव, Video

Holi 2023 : काठीच्या राजवाडी होळीत रंगले आदिवासी बांधव! 5 दिवस चालणार मोठा उत्सव, Video

Holi 2023 : आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय.

  • -MIN READ Nandurbar,Maharashtra
  • Last Updated :

    नुपूर पाटील, प्रतिनिधी नंदुरबार, 8 मार्च :  आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी   मोठ्या थाटात संपन्न झाली. या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता आगामी पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळेल. काय आहे परंपरा? आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरु केल्याच म्हटलं जातं. 1246 पासून सुरु झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि सामानातेतील वैविध्याचे रंग आणि पाम्पारिक स्वरूप कायम ठेवून आहे. सातपुड्यातील डोंगर रागांमधील काठीची राजवाडी होळीचा मोठ्या उत्साहात असतो. आदिवासी बांधव ही होळी पारंपारिक पद्धतीनं साजरी करतात. ढोल, बासरी,  शिट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होते. स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधव पाहटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली आणि वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन गेले. धुलिवंदनाला जावयाची निघाली गाढवावरून मिरवणूक, बीड जिल्ह्यातील अजब परंपरेचे पाहा Photos होळी साजरी करताना आदिवासी संकृतीत पुरुष महिला असा भेदाभेद नाही. गरीब - श्रीमंतीची आडकाठी तर मुळीच नाही. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये राजावाडी होळी म्हणून लौकिक असलेल्या “काठी” संस्थांची होळी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूम धडाक्यात साजरी होते. मुक्त आणि प्रसन्न वातावरणात सातपुड्यातील होळी साजरी करण्यात येते. कुणालाही आमंत्रण दिल जात नाही कि कुणाला मानसन्मान दिला जात नाही तरी या होळी उत्सवाला हजारो आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेत काठीच्या होळी उत्सवात सामील झाले होते. अशी माहिती आयोजक सी. के. पाडवी यांनी दिली. होळीची अनोखी परंपरा; या ठिकाणी स्पर्धेत हरणाऱ्याला वाटावी लागते मिठाई संपूर्ण रात्रभर बेधुंद होऊन नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर येथे येणारा प्रत्येक जण भारावून जातो. सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रती असलेला आदर भाव हा या समाजाला अजूनही एकत्र ठेवून आहे. काठीची ही राजवाडी होळी हे या एकतेचं मुख्य कारण आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात