विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी
नाशिक 15 मार्च : सोने चांदीची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये सोन्याच्या दरात घट तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. काल 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर 58 हजार 10 रुपये होता, आज तोच दर 57 हजार 900 रुपयांवर आला आहे. यामुळे तोळ्या मागे 110 रुपये कमी झाले आहेत. तसेच 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा काल 53 हजार 180 रुपये होता, आज तोच दर 53 हजार 80 रुपयांवर आला आहे. यामुळे तोळ्या मागे 100 रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे आज सोन्याचे दागिने घेण्यासाठी काहीसे कमी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे दागिने घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
सोन्याचे आजचे दर
सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 57,900
10 ग्रॅम 22 कॅरेट- 53,080
सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,790
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,308
सोन्याचे कालचे दर
सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 58,010
10 ग्रॅम 22 कॅरेट- 53,180
सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,801
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,318
चांदीच्या दरात वाढ
चांदीचे दर काल 66 हजार 310 रुपये किलो होते,आज दर 66 हजार 620 रुपयांवर गेले आहेत. म्हणजे साधारण किलो मागे 310 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे दागिने घेण्यासाठी आज जास्त पैसे मोजावे लागतील.
चांदीचे आजचे दर
66 हजार 620 रुपये किलो
चांदीचे कालचे दर
66 हजार 310 रुपये किलो
चांदीच्या दरात किलोमागे 310 रुपयांनी वाढ झाली आहे.
या दागिन्यांना आहे विशेष मागणी
आता बाजारपेठेत लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो. यामध्ये नवीन प्रकार आहेत आकर्षक आहेत. त्यामुळे जास्त मागणी सध्या या दागिन्यांना आहे.
(टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nashik