मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gold-Silver Rate Today in Nashik : दीर्घ गुंतवणुकीसाठी करा सोन्याची खरेदी, पाहा किती आहे नाशिकमधील आजचा भाव

Gold-Silver Rate Today in Nashik : दीर्घ गुंतवणुकीसाठी करा सोन्याची खरेदी, पाहा किती आहे नाशिकमधील आजचा भाव

Gold Silver Rate in Nashik : सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नाशिक बाजारपेठ ही प्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते. याचं बाजारपेठेत आज दर काय आहेत जाणून घ्या.

Gold Silver Rate in Nashik : सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नाशिक बाजारपेठ ही प्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते. याचं बाजारपेठेत आज दर काय आहेत जाणून घ्या.

Gold Silver Rate in Nashik : सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नाशिक बाजारपेठ ही प्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते. याचं बाजारपेठेत आज दर काय आहेत जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

    विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी

    नाशिक, 27 मार्च : सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नाशिक बाजारपेठ ही प्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते. राज्यभरातील अनेक नागरिक नाशिक बाजारपेठेत दागिने खरेदी करण्यास पसंती देतात. नाशिकमध्ये आज सोने चांदीच्या दरात घट झाली आहे. काल 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर 59 हजार 870 रुपये होता,आज तोच दर 59 हजार 760 रुपयांवर आला आहे. यामुळे तोळ्या मागे 110 रुपये कमी झाले आहेत. तसेच काल 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 54 हजार 880 रुपये होता,आज तोच दर 54 हजार 780 रुपये झाला आहे. यामुळे तोळ्या मागे 100 रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे आज सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत.

    सोन्याचे आजचे दर

    सोन्याचे दर (10 ग्रॅम)

    10 ग्रॅम 24 कॅरेट - 59,760

    10 ग्रॅम 22 कॅरेट- 54,780

    सोन्याचे दर (1 ग्रॅम)

    1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,976

    1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,478

    सोन्याचे कालचे दर

    सोन्याचे दर (10 ग्रॅम)

    10 ग्रॅम 24 कॅरेट - 59,870

    10 ग्रॅम 22 कॅरेट- 54,880

    सोन्याचे दर (1 ग्रॅम)

    1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,987

    1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,488

    चांदीच्या दरात घट

    चांदीचे दर काल 70 हजार 460 रुपये किलो होते. आज 70 हजार 290 रुपयांवर आले आहेत. म्हणजे साधारण किलोमागे 170 रुपये घट झाली आहे. त्यामुळे आज चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत.

    चांदीचे आजचे दर

    70 हजार 290 रुपये किलो

    चांदीचे कालचे दर

    70 हजार 460 रुपये किलो

    किलोमागे साधारण 170 रुपये कमी झाले आहेत.

    या दागिन्यांना आहे विशेष मागणी

    आता बाजारपेठेत लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो. यामध्ये नवीन प्रकार आहेत आकर्षक आहेत. त्यामुळे जास्त मागणी सध्या या दागिन्यांना आहे.

    (टीप :  सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)

    First published:
    top videos

      Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nashik