विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक 24 मे : सध्या राज्यात लग्नसराईचा काळ असून अनेकजण सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करत आहेत. सोन्या-चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात ठरत असल्याने रोजचे दर बदलत असतात. त्यामुळं सोनं खरेदी करताना ताजा दर माहिती असणं गरजेचं असतं. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 260 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोनं 61 हजार 390 रुपयांवर गेलं आहे. तर 22 कॅरेटच्या सोन्यालाही 250 रुपयांच्या वाढीसह आज 56 हजार 280 रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीच्या दरात घट सोन्याच्या दरात आज काहीशी वाढ झाली असली तरी चांदी मात्र स्वस्त झाली आहे. आज चांदीच्या दरात 460 रुपयांची घसरण झाली आहे. कालच्या 72 हजार 380 रुपये प्रति किलो दरावरून आज चांदी 71 हजार 920 रुपयांवर आली आहे.
सोनं गुंतवणुकीचा चांगला मार्ग सोन्याकडं गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे भारतीय लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. पुढील काळातही अशीच वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हाच काळ सोनं खरेदीसाठी उत्तम असल्याचे जाणकारांचे मत आहे. आजचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 61,390 10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,280 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,139 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,628 कालचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 61,130 10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,030 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,113 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,603 चांदीचे आजचे दर 71 हजार 920 रुपये किलो चांदीचे कालचे दर 72 हजार 380 रुपये किलो (टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)