विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 6 मे : भारतीय लोकांना सोन्या-चांदीचे चांगलेच आकर्षण आहे. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यांना महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. तर गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. त्यामुळे बदलणाऱ्या दरांवर सर्वांचेच लक्ष असते. नाशिक मध्ये आज सोन्याच्या दरात घट झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहेत. नाशिकमध्ये काल 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 62 हजार 430 रुपये होता,आज तोच दर 61 हजार 670 रुपयांवर आला आहे. यामुळे तोळ्या मागे 760 रुपयांनी घट झाली आहे. तर काल 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर 57 हजार 230 रुपये होता,आज तोच दर हा 56 हजार 530 रुपयांवर आला आहे. यामुळे तोळ्या मागे 700 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे. सोन्याचे आजचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 61,670 10 ग्रॅम 22 कॅरेट- 56,530 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,167 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,653 सोन्याचे कालचे दर सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 62,430 10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,230 सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,243 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,723
चांदीच्या दर स्थिर चांदीचे दर काल 76 हजार 940 रुपये किलो होते,आज ही दर 76 हजार 940 रुपयेच आहेत. आजच्या दरात वाढ किंवा घट झालेली नाही. चांदीचे आजचे दर 76 हजार 940 रुपये किलो चांदीचे कालचे दर 76 हजार 940 रुपये किलो या दागिन्यांना आहे विशेष मागणी
आता बाजारपेठेत लाईट वेट ज्वेलरी, टिंपल ज्वेलरी तसेच कलर ज्वेलरीमध्ये, रोज गोल्ड, पिंक गोल्ड या दागिन्यांना विशेष मागणी आहे. कारण यामध्ये विविध प्रकार आले आहेत. तसेच महिलांचा आकर्षक आणि कमी वजनाचे दागिने परिधान करण्याकडे जास्त कल असतो. यामध्ये नवीन प्रकार आहेत आकर्षक आहेत. त्यामुळे जास्त मागणी सध्या या दागिन्यांना आहे. (टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)

)







