नाशिक 8 सप्टेंबर : घरगुती गणपती विसर्जनासाठी (Ganesh Immersion) नाशिक महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभाग अंतर्गत,टँक ऑन व्हील्स, फिरता विसर्जन रथ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.नाशिक शहरातील सहा विभागांमध्ये या रथाचे नियोजन केले आहे.प्रत्येक भागात सकाळी 10 पासून संध्याकाळपर्यंत हा विसर्जन रथ असेल. यामध्ये गणपती बाप्पाचे तुमच्या समोरच रथात विसर्जन करून मूर्ती संकलित केल्या जातील. या सहा विभागात येणार विसर्जन रथ तुमच्या विभागात रथ हवा असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करा.. विभाग निहाय संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे- पंचवटी, श्री. संजय दराडे- 9763257778 नाशिक पश्चिम, श्री. संजय गोसावी- 9423179176 नाशिक पूर्व, श्री. सुनील शिरसाठ- 9423179173 नाशिक रोड, श्री. अशोक साळवे- 9423179172 नवीन नाशिक, श्री. संजय गांगुर्डे- 9423179171 सातपूर, श्रीमती. माधुरी तांबे- 9423179175 गर्दी टाळण्यासाठी उपक्रम नाशिकमध्ये सध्या कोरोना आणि स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट आहे. गणपती विसर्जनावेळी वाढती गर्दी बघता,रुग्ण अधिक वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे फिरता विसर्जन रथाचा हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.या रथातच गणपतीचे विसर्जन करून,मूर्ती ही संकलित केल्या जातील.यामुळे पर्यावरणपूरक बाप्पाचे विसर्जन होईल.तसेच आपल्या आरोग्याची ही काळजी घेता येईल आणि गर्दीत जाणे टाळता येईल. नाशिक शहरातील सर्वच नागरिकांनी या फिरत्या विसर्जन रथाला प्रतिसाद द्यावा,आपल्या विभागात जर रथ हवा असेल तर, विभागनुसार संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधावा असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ आवेश पल्लोड यांनी केले आहे. Nashik :‘या’ भागात करा बाप्पाचे विसर्जन, एका क्लिकवर पाहा तुमच्या जवळचे ठिकाण नाशिक महापालिकेने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.कारण ज्या ठिकाणी विसर्जन कुंड असतात.त्या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.आणि यामुळे आरोग्याचा ही प्रश्न निर्माण होतो. कोरोना,स्वाईन फ्ल्यू हे संसर्गजन्य रोग गर्दीच्या ठिकानाहून जास्त फैलावतात.त्यामुळे ही काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.तसेच काही नैसर्गिक कुंडांमध्ये विसर्जन.करताना लहान लहान मुल पाण्यात उतरतात.आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडतात.अशा ही अनेक घटना मागील काळात समोर आल्या आहेत.त्यामुळे या अनोख्या उपक्रमाला सर्वांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.