जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात येत होतं परप्रांतीय दाम्पत्य, ट्रेनमध्येच कोसळला दुःखाचा डोंगर

पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात येत होतं परप्रांतीय दाम्पत्य, ट्रेनमध्येच कोसळला दुःखाचा डोंगर

ट्रेनमध्येच कोसळला दुःखाचा डोंगर

ट्रेनमध्येच कोसळला दुःखाचा डोंगर

कामाच्या शोधात उत्तर प्रदेश मधून पुण्याला येणाऱ्या दम्पत्याचं 5 महिन्याचा बाळ रेल्वेत दगावलं. मन हेलावून टाकणारी ही घटना मनमाड रेल्वे स्थानकाजवळ घडली.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

बब्बू शेख, प्रतिनिधी नाशिक, 19 मे : पोटाची खळगी भरण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात येते. उत्तर भारतातील अनेक राज्यातून रोजगाराच्या शोधात लोक महाराष्ट्रात येत असतात. अशाच एका जोडप्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथून पुण्याला जाणाऱ्या दाम्पत्याचं 5 महिन्याचं बाळ दगावलं. ही मन हेलावून टाकणारी घटना लखनऊ-पुणे एक्सप्रेसमध्ये घडली. मनमाडला या बाळाचा दफनविधी करण्यात आला. काय आहे घटना? कामाच्या शोधात गोविंद पासवान, सुमन पासवान हे दाम्पत्य 5 महिन्याच्या बाळासोबत लखनऊ-पुणे एक्सप्रेसने पुण्याला जात होते. गाडीत बसल्याच्या वेळी बाळ ठणठणीत होतं. मात्र, गाडी मनमाड येण्याअगोदर बाळ काहीच हालचाल करत नसल्याचे पाहून पासवान दाम्पत्याने हंभरडा फोडला. गाडी मनमाडला पोहचल्यानंतर येथे उतरून त्यांनी वेटर, वेंडरच्या मदतीने जवळ असलेल्या दवाखान्यात नेले असता बाळ दगावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पासवान दाम्पत्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळसा. अनोळखी शहरात बाळाचा अंत्यविधी कसा करावा असा प्रश्न या दाम्पत्याला पडला होता. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे मदतीला धावून आले आणि त्यांनी या बाळाचा अंत्यविधी केला. ट्रेनमध्ये वाढलेली गर्दी, कडक ऊन आणि उष्मा यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. वाचा  - Pune Weather Update : पुणेकरांनो, सावधान! आज सूर्य डोक्यावर, इतकं वाढणार तापमान उष्माघाताने राज्यात 4 जणांचा मृत्यू उष्माघाताने राज्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील हिमायतनगर येथील एकाचा व पैठणमधील आडूळ बु. येथील तातेराव वाघ यांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील राहुरी येथील शेतकरी साहेबराव आव्हाड आणि अकोल्यात ट्रकचालक अकबर शहा मेहबूब शहा यांचा मालेगाव येथे उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हात बाहेर जाऊ नका असे आवाहन करण्यात येत आहे. का आली उष्णतेची लाट बंगालच्या उपसागरात बदल होत आहे. याठिकाणी मोचा वादळ सक्रीय झाले आहे. त्यामुळे अवकाळी पडणारा पाऊस जाऊन राज्यातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील 72 तासांत यंदाच्या वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात