मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik Special Report : लेक असावी तर अशी! कोरोनाकाळात 14 वर्षांच्या अस्मीने पूर्ण केले तब्बल 25 कोर्स, एक ई-बुकदेखील नावावर

Nashik Special Report : लेक असावी तर अशी! कोरोनाकाळात 14 वर्षांच्या अस्मीने पूर्ण केले तब्बल 25 कोर्स, एक ई-बुकदेखील नावावर

X
अस्मी

अस्मी पेठकर, नाशिक

कोरोनाकाळात विद्यार्थी घरीच ऑनलाईन शिक्षण घेत होते. पण, औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त नाशिकमधील 14 वर्षीय अस्मी पेठकर हिने तब्बल 25 ऑनलाईन कोर्स पूर्ण केले. इतकंच नाही तर तिने एक ई-बुकदेखील लिहिले आहे.

  नाशिक, 17 जून : कोरोनाकाळात (Corona) लाॅकडाऊनमुळे सगळेच विद्यार्थी ऑनलाईन शिकत होते. नेहमीपेक्षा जास्त वेळ विद्यार्थ्यांना मिळाला होता. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केले असतील, असं नाही. पण, नाशिकच्या 14 वर्षे असणाऱ्या अस्मी पेठकर हिने कोरोनाकाळाचा सदुपयोग करून विविध प्रकारचे 25 पेक्षा जास्त कोर्स (Online Course) पूर्ण केले, इतकंच नाही तर एक ई-बुकदेखील अस्मीने लिहिले आहे. या यशामुळे सर्वच स्तरातून कौतुक तिचे कौतुक केले जात आहे. (Inspirational Story of Asmi Pethkar in nashik)

  कोरोनाकाळात सर्वच जण घरात बसून होते. बऱ्याच जणांचे कामकाज हे ऑनलाईन सुरू होते. त्यामुळे अनेकांना घरात काय करावं समजत नव्हतं. काही जण तर नैराश्यात गेल्याचंही दिसून आलं. पण, म्हसरुळ भागात राहणाऱ्या अस्मीने कोरोनाकाळातील 2 वर्षांचा चांगलाच उपयोग करून घेतला. अस्मी सुधीर पेठकर (वय-14 वर्षे) सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. अस्मी लहानपणापासून हुशार आहे. तिला अभ्यासाची खूप आवड आहे. त्यामुळे तिने वेळेचा चांगला उपयोग करून घेण्याचं ठरवलं.

  वाचा : Success Story : ‘रोशनी’च्या यशाने उजाळली घरकाम करणाऱ्यांची 10 बाय 10ची खोली, आईच्या डोळ्यात पाणी!

  मात्र करायचं काय, असा तिच्यासमोर प्रश्न होता. तिच्या मनात आल की, आपला शाळेचा ऑनलाईन (Online School) तर अभ्यास सुरू आहेच. त्याबरोबर जर आपण ऑनलाईन काही कौशल्यपूर्ण कोर्स केले तर? वडील सुधीर पेठकर आणि आई वृषाली पेठकर यांना विषय सांगितला. त्यांनी तिला लगेच होकार दिला आणि मग खऱ्या अर्थाने तिने ऑनलाईन कौशल्यपूर्ण कोर्स शिकण्यास सुरूवात केली. तेव्हा तिला अनेक कोर्सची माहिती ऑनलाईन दिसून आली. मात्र, जे कोर्स केल्याने आपल्यात बदल होईल, आपल जीवन परिपूर्ण होईल, त्याचा या डिजिटल युगात कसा उपयोग होईल, याचा पूर्ण विचार करूनच तिने कोर्से निवडले आणि ते पूर्णदेखील केले.

  अस्मीने कोणकोणते ऑनलाईन कोर्स पूर्ण केले? 

  व्हिडिओ मेकींग (05 कोर्स), व्हिडिओ एडीटींग (03 कोर्स), इंग्लिश स्पीकींग (01), ॲडव्हान्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स (01), कम्युनिकेशन स्कील्स (02), पब्लिक स्पीकिंग (02 कोर्स), यू ट्यूब चॅनल (05 (कोर्स), बूक रायटींग (02 कोर्स), क्लासिकल व्होकल (01), योगा (01), फिटनेस (1कोर्स), भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य (03 कोर्स), नृत्य योगसूत्र (01), व्हाईट हॅट ज्युनिअर डेमो कोर्स (01), असे एकूण 25 कोर्स अस्मीने पूर्ण केले आहेत.

  वाचा : Success Story: अनाथाश्रमात राहून तीनं डॉक्टर होण्याचं स्वप्न केलं साकार; जिद्दीनं मिळवलं यश

  अस्मी इतकंच करून थांबली नाही, तर तिने 55 ऑनलाईन राष्ट्रीय स्पर्धांमध्येदेखील सहभाग घेतला. यात कविता लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, योगा, हस्ताक्षर, कोट्स मेकिंग (सुविचार), इंग्लिश ग्रामर, पब्लिक स्पीकिंग आदी विषयांचा समावेश आहे. तिची शिक्षणाची आवड आणि तिने लिहिलेले ई-बुक पाहून लेखक एन. रघुरामन यांनी तिल्या फोनवरूनही शुभेच्छा दिल्या.

  How COVID Pandemic changed my life असे अस्मीने लिहिलेल्या ई-बुकचे नाव आहे. या स्पर्धातून तिला 34 प्रमाणपत्र, 7 ट्रॉफीज व 10 मेडल मिळाले. ती भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे शिक्षण मागील 08 वर्षांपासून घेत आहे. तिला शालेय शिक्षिका, भरतनाट्यम नृत्यांगणा, योगशिक्षक, प्रेरणादायी वक्ता, लेखिका हे बनायची महत्त्वाकांक्षा आहे.

  First published:
  top videos

   Tags: Career, Maharashtra News, Nashik, Online education, Success stories