मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भुजबळांच्या नातींचा इंग्लंडमध्ये डंका, देशाला मिळवून दिले 2 गोल्ड

भुजबळांच्या नातींचा इंग्लंडमध्ये डंका, देशाला मिळवून दिले 2 गोल्ड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नातींनी वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत देशाला गोल्ड मेडल मिळवून दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नातींनी वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत देशाला गोल्ड मेडल मिळवून दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नातींनी वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत देशाला गोल्ड मेडल मिळवून दिले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    धनंजय दळवी, प्रतिनिधी

    मुंबई, 21 फेब्रुवारी : इंग्लंड येथील केंट शहरात झालेल्या इंटरनॅशनल फिल्ड असोसिएशनद्वारे आयोजित ‘वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप 2023’ या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या दोन्ही नाती देविशा व तनिष्का पंकज भुजबळ यांनी सुवर्ण कामगिरी केली. त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. देविशा आणि तनिष्का या माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कन्या आहेत. त्यांनी चमकदार कामगिरी करीत भारतासाठी सुवर्ण पदक मिळविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

    देविशा व तनिष्का या दोघीही भुजबळ नॉलेज सिटी एमईटी मुंबई या विद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. इंग्लडच्या मेडवे पार्क स्पोर्ट्स सेंटर, गिलिंगहॅम, केंट येथे 13 ते 18 फेब्रुवारी मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत 38 देशातील 568 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारताचे 12 स्पर्धक विविध वयोगटात आणि वेगवेगळ्या धनुष्य प्रकारात सहभागी झाले होते.

    Aurangabad News : राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षीची भरारी, दिग्गजांना मागं टाकत रचला इतिहास, Video

    या स्पर्धेत देविशा पंकज भुजबळ हिने 19 वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात सुवर्णपदक आणि तनिष्का पंकज भुजबळ हिने 17 वर्षाखालील कम्पाऊंड बो गटात 1 सुवर्णपदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्जवल केले आहे. भारतीय संघ हा फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाच्या बॅनरखाली खेळला होता.

    या स्पर्धेचे उदघाटन मिडवे केंटच्या महापौर सौ.जेन अल्डोस आणि श्री टॉनी अल्डोस तसेच आंतरराष्ट्रीय फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष मार्टिन कोइनी, उपाध्यक्ष स्टिफन केंड्रीक, उपाध्यक्ष मेरियेट फ्रायर, सचिव लेन एलिंगवर्थ आणि इंग्लंड फील्ड आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष डेव मुरे यांच्या हस्ते पार पडले.

    First published:
    top videos

      Tags: Local18, Mumbai, Nashik, Sport