राहुल पाटील, नाशिक, 29 जून : आजकाल सोशल मीडियावर अनेक लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करताना दिसून येतात. दिवसेंदिवस याची क्रेझच बनत चालली आहे. लोक चर्चेत येण्यासाठी काहीतरी हटके, विचित्र, मजेशीर, धोकादायक व्हिडीओ बनवतात. नुकताच एक स्टंट व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये काही तरुण मुलं धोकादायक स्टंट करत आहेत. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर येत आहे. सध्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेही बाहेर जाताना सावधानतचा बाळगण्याचं सांगितलं जात आहे. नुकताच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तरुण आणि चिमुकले उंच पूलावरुन नदीत उड्या मारताना दिसत आहे. हे धोकादायक दृश्य सध्या चर्चेत आलं आहे.
डहाणू नाशिक मार्गावरील कासा येथील सुर्या नदीवरील पुलावरील ही घटना आहे. धोकादायक वाहत्या पाण्यात उड्या मारून तरुणांची आणि चिमुकल्यांची स्टंटबाजी दिसून आली. 30 फुटांपैक्षा अधिक उंचावरील पुलावरुन ही मुलं उड्या मारत होती. अतिउत्साही तरुणांच्या स्टंट चा व्हिडिओ न्युज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. स्टंट करणाऱ्यांमध्ये काही तरुण तर काही अल्पवयीन मूल होती. चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसात जीव धोक्यात घालून तरुणांची स्टंटबाजी सध्या गंभीर विषय मानला जातोय.
चिमुकल्या मुलांचा धोकादायक नदीत स्टंट; 30 फुटांपैक्षा जास्त उंचावरील पुलावरुन उड्या, डहाणू नाशिक मार्गावरील प्रकार#nashik #viral #stuntvideo #news18lokmat pic.twitter.com/PInWRhjV5L
— News18Lokmat (@News18lokmat) June 29, 2023
दरम्यान, अशा स्टंटबाजीमुळे मोठी जिवित हाणीदेखील होऊ शकते. गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे लोकांना प्रवास करण्यामध्ये अडचण येत आहे तर गर्दीमुळे लोकांचा मनस्ताप होत आहे.