जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता पण..' निलंबनानंतर सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रिया

'मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता पण..' निलंबनानंतर सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रिया

निलंबनानंतर सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रिया

निलंबनानंतर सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेस पक्षाने कारवाई केल्यानंतर आमदार सुधीर तांबे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 15 जानेवारी : काँग्रेसचे पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने अखेर कारवाई करत निलंबन केलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्म पाठवूनही आमदार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्याने ही कारवाई केली आहे. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कारवाईनंतर सुधीर तांबे यांनी आपली भूमिका मांडली आहे. 18 जानेवारीला करणार भूमिका स्पष्ट डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे येत्या 18 जानेवारीला भुमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही निवडणूक प्रचारात व्यस्त आहोत. आमची भुमिका आम्ही योग्य वेळी मांडणार आहे. काय घडामोडी होतात यापेक्षा निवडणूक महत्वाची आहे. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे चौकशी होईपर्यंत मी काही बोलणार नाही. मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा आहेत, त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. मला जर पक्ष श्रेष्ठींनी बोलावलं, तर मी भूमिका मांडायला जाईल असेही तांबेंनी सांगितले. सुधीर तांबे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

जाहिरात

दरम्यान, त्यानंतर काहीच वेळात सुधीर तांबे यांनी ट्विट केलं आहे. यात “माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे.”, असं म्हटलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काँग्रेसच्या शिस्तभंग समितीकडून सुधीर तांबे यांचं निलंबन उमेदवारी आणि एबी फॉर्म देऊनही अर्ज दाखल न करणाऱ्या सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशी होईपर्यंत सुधीर तांबे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या शिस्तभंग समितीकडून सुधीर तांबे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान सत्यजीत तांबे यांच्याबाबत अजूनतरी पक्षाने कोणताही निर्णय घेतला नाही, पण नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात