नाशिक, 2 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. करमाळा आगारातील बस वाहकाला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोलापूर ते नाशिक अशी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बस वाहकाला ही मारहाण करण्यात आली. द्वारका परिसरात टोळक्याने या वाहकाला 31 ऑगस्ट 2022 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मारहाण केली. काय आहे संपूर्ण प्रकरण - वैभव थोरात असे मारहाण झालेल्या एसटी बस वाहकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. करमाळा आगाातील बस क्रमांक एमएच 14 बी. टी. 2825 चे वाहक वैभव ब्रम्हदेव खरात (34, रा. करमाळा) आणि चालक महादेव भिमराव शेंबरे बस सोलापूरहून नाशिक घेऊन जात होते. यावेळी प्रवासादरम्यान असताना दोन महिला प्रवाशी शिर्डी ते नाशिक प्रवासासाठी बसमध्ये बसल्या होत्या. त्यांनी नाशिकरोड बस स्थानकाचे तिकीट घेतले. त्यापैकी एक महिला नाशिकरोड येथे उतरली तर लहान मुलगा हा नाशिरोड बसस्थानक याठिकाणी उतरला. याचदरम्यान, एक महिला नाशिकरोडला उतरली नाही. यानंतर बसमधूनच प्रवास करीत आहे, बसवाहक खरात यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी महिलेला 10 रुपयांचे तिकीट दिले. त्यामुळे महिलेने वाहक खरात यांच्यासोबत वाद घातला. तसेच त्यांच्या मुलाला फोन करून द्वारका सर्कल येथे बोलावून घेतले. ही बस जोपर्यंत द्वारका येथे पोहोचली तोपर्यंत या महिलेचा मुलगा याठिकाणी पोहोचला होता. तसेच त्या मुलाने यावेळी बसमध्ये चढून वाहकाला मारहाण केली. तसेच बसच्या खाली ओढून त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी खरात यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. हेही वाचा - सरपंचाने घरकुलासाठी मागितले पैसे, एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडले यानंतर वाहक वैभव खरात यांनी याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गेंगजे तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.