लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 23 जुलै : मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व संशयित आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला. या सर्व कार्यकर्त्यांचा अमित ठाकरे सत्कार करणार आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांचं वाहन अडवले म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणात काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. या सर्व आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांच्या सत्काराला अमित ठाकरे उद्या नाशिकला येणार आहेत. टोल नाका तोडफोड करणाऱ्या नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांचा उद्या सकाळी 11 वाजता अमित ठाकरे स्वतः करणार सत्कार आहे. काय आहे घटना? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेविरोधात संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली. टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरली. फास्ट टॅग असूनही बराचवेळ गाडी थांबवण्यात आली, टोकनाक्यावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, मॅनेजरसह कर्मचारी उद्धट भाषणे बोलले असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मी जेव्हा नाशिकला पोहोचलो तेव्हा मला कळालं टोल नाका फोडला. राज ठाकरे यांच्यामुळे अनेक टोलनाके बंद झाले, आता त्यात माझ्यामुळे आणखी एकाची भर पडली. वाचा - उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीआधीच वातावरण तापलं; लोक उत्सुक आहेत.., भाजपचा टोमणा समृद्धी टोल नाका तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेल्या टोलनाका प्रकरणी पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली. टोल मॅनेजरच्या तक्रारीनंतर 12 ते 15 जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. नाशिक ग्रामीण भागातील वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. टोल मॅनेजरच्या तक्रारीत 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा उल्लेख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







