जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे एक दिवस अगोदर होणार प्रस्थान, पाहा कसा असेल आषाढी वारीचा मार्ग

निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे एक दिवस अगोदर होणार प्रस्थान, पाहा कसा असेल आषाढी वारीचा मार्ग

निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे एक दिवस अगोदर होणार प्रस्थान, पाहा कसा असेल आषाढी वारीचा मार्ग

संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे एक दिवस अगोदर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. यंदा मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडणार आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक,18 मे : आषाढी एकादशीनिमित्त संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून येत्या 2 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. एक दिवस अगोदर पालखी प्रस्थान करणार आहे. एकूण 28 दिवसांचा हा प्रवास असणार आहे. यंदा मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडणार आहे. यामुळे शेकडो भाविक या सोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंढरपूरची पायी वारी मुख्य उपासना महाराष्ट्र ही वारकरी संतांच्या विचारांची भूमी आहे. वारकरी संतांनी संत वाङ्मयातून या महाराष्ट्राला भगवान पांडुरंगाच्या सगुण उपासनेचे अनेक मार्ग दाखवले आहेत. त्यात पंढरपूरची पायी वारी ही मुख्य उपासना आहे. माझ्या जीवीची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी, प्रती वर्षी आषाढी वारीला भगवान पांडुरंगाच्या भेटीसाठी महाराष्ट्रातून अनेक संत महात्म्यांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात.

News18लोकमत
News18लोकमत

त्यात वारकरी संप्रदायाचे आद्य गुरू संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांची ही पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरला जात असते. यामध्ये शेकडो वारकरी भक्त सहभागी होत असतात. यंदा हा पालखी सोहळा 2 जून रोजी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करेल. एकूण 28 दिवसांचा हा प्रवास असणार आहे, असं संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर विश्वस्त संजय महाराज धोंगडे यांनी सांगितले आहे. कोणत्या मार्ग जाईल पालखी? नाशिक, अहमदनगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून हा सोहळा पुढे पंढरपूरला जाणार आहे. यात लाखो वारकरी, हजारो टाळकरी आणि मृदुंगाचा जयघोष असणार आहे. दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. पायी चालणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्रीरामानं घेतलं होतं दर्शन, सप्तश्रृंगी मंदिराचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? पाहा Video

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून प्रस्थान झाल्यावर आंदळीतच आजोळघरी मुक्कामी थांबते. त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांची पालखी प्रयागतीर्थाजवळील महानिर्वाणी आखाड्यात त्यांचे सदगुरु गहिनीनाथ महाराजांच्या समाधीस्थानी गुरुघरी थांबेल. असा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. प्रथमच ही प्रथा सुरु होत आहे, असंही संजय महाराज धोंगडे यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात