मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik News : नाशिक हादरलं! बाल्कनीत खेळत असताना अवघ्या 18 महिन्याच्या समृद्धीचा तोल जाऊन मृत्यू

Nashik News : नाशिक हादरलं! बाल्कनीत खेळत असताना अवघ्या 18 महिन्याच्या समृद्धीचा तोल जाऊन मृत्यू

पहिल्या मजल्यावरुन पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे चिमुकलीच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

पहिल्या मजल्यावरुन पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे चिमुकलीच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

पहिल्या मजल्यावरुन पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे चिमुकलीच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

नाशिक,10 ऑगस्ट : नाशिकमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. पहिल्या मजल्यावरुन पडून 18 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे चिमुकलीच्या आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. नाशिकच्या पवन नगर ज्योती अपार्टमेन्ट मध्ये ही दुर्दैवी घटना घडली. समृद्धी राहुल खैरनार असे मृत चिमुकलीचे नाव आहे. (Nashik News) बाल्कनीत खेळत असताना समृद्धीचा तोल गेला आणि समृद्धी पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी बाल्कनीत खेळत होती. बराच वेळ खेळत असताना ती कडेला गेली दरम्यान तिचा तोल गेल्याने पहिल्या मजल्यावरून खाली पडली. यावेळी तिचे आईवडील घटनास्थळी नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे ती पडल्यानंतर लगेच तिला उपचार केले असते तर वाचली असती अशीही चर्चा सुरू होती. समृद्धीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

हे ही वाचा : Video : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात माजी सैनिकाचा मृत्यू, राष्ट्रगीत सुरू झालेलं ऐकलं अन् उभ्या उभ्या सोडला जीव

या घटनेमुळे राहुल खैरनार आणि खैरनार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 18 महिन्यांच्या समृद्धीच्या मृत्यूने लहान मुलांना एकटे बाल्कनीत सोडल्याने एका निष्पाप जिवाला मुकावे लागल्याने शेजाऱ्यांचेही मन हेलावले असल्याचे सांगितले. लहान मुलांना एकटे सोडल्याने त्यांच्या जिवावर बेतू शकते हे पुन्हा एकदा आधोरेखित झाले आहे.

ही घटना घडली तेव्हा या मुलाचे आई-वडील नेमके कुठे होते, याची माहिती मिळू शकलेली नाही. बाल्कनीत खेळत असतेवेळी घडलेल्या या दुर्घटनेबाबत कळल्यानंतर परिसरातील सगळ्यांनाच धक्का बसलाय. याप्रकरणी आता अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई केली जातेय. या दुर्दैवी घटनेबाबत कळल्यानंतर चिमुरड्या समृद्धीच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

हे ही वाचा : नाशिकमध्ये चाललंय काय? आदिवासी आश्रमशाळेत 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

पंधरा दिवसातली दुसऱ्या घटनेने हळहळ

मागच्या 8 दिवसांपूर्वी वसईत बाल्कनीतून पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. मुंबईला लागून असलेल्या वसईत ही दुर्दैवी घटना घडल्याने मोठी चर्चा झाली होती. वसईच्या पश्चिमेला असलेल्या अग्रवाल कॉम्लेक्समधील रेजन्सी विला या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन खाली पडल्याने श्रेया महाजन या अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता.

First published:

Tags: Death, Nashik, One child

पुढील बातम्या