बब्बू शेख, प्रतिनिधी
येवला (नाशिक), 27 नोव्हेंबर : मॅजिक बॉल गिळल्याने नाशकातील दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येवल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मधाचे मोहोळ काढण्याचा मोह एका 12 वर्षीय बालकाच्या जीवावर बेतल्याने त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. येवल्याच्या येवल्याच्या सुरेगाव येथे ही घटना घडली. ऋषिकेश चव्हान, असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसर सुन्न झाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण -
मधाचा मोहोळ काढणे एका 12 वर्षीय बालकाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना येवल्याच्या सुरेगाव येथे घडली. शेतात असलेले मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश चव्हान गेला होता. मात्र, त्याच्यामागे मधमाशा लागल्यामुळे तो पळत जात असताना विहिरीत पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ होऊन देखील ऋषिकेश घरी न आल्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला असता विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सुरेगावावरून शोककळा पसरली.
हेही वाचा - गर्दीच्या ठिकाणीच वडापाव विक्रेत्यांवर कोयत्यानं हल्ला, घटनेनं नाशिक हादरलं, Live Video
मॅजिक बॉल गिळल्याने नाशकातील दीड वर्षीय मुलाचा मृत्यू -
अतिशय छोट्या चुकीमुळे किंवा थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे लहान मुलांचा जीव गेल्याच्या अनेक घटना समोर येत राहतात. आज नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात वडिलांच्या दुर्लक्षामुळे 18 महिने वय असलेल्या बालकाचा मृत्यू झाला. छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने या बालकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर बालकाच्या आईने आपल्या पतिविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवांश संकेत बोराडे असं18 महिन्याच्या बालकाचं नाव असून त्याचा मृत्यू छोटा मॅजिक क्रेझी बॉल गिळल्याने झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.