जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कांद्याच्या ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण ठार, येवला बाजार समितीतील दुर्दैवी घटना

कांद्याच्या ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण ठार, येवला बाजार समितीतील दुर्दैवी घटना

कांद्याच्या ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण ठार, येवला बाजार समितीतील दुर्दैवी घटना

बाजार समितीच्या आवारात घडलेल्या या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अनिस पठाण असे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बब्बू शेख, येवला, 7 फेब्रुवारी : ट्रॅक्टरखाली सापडल्याने तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी येवला इथं घडली आहे. येवल्यातील लासलगाव बाजार समितीच्या आवारात घडलेल्या या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अनिस पठाण असे आहे. अनिस पठाण हा बाजार समितीत मजूर म्हणून काम करत होता. येवला बाजार समितीमध्ये लिलाव झालेले कांदे ट्रॅक्टरमध्ये भरत असताना मागून आलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून अनिस पठाण याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संतप्त मजुरांनी कांदा लिलाव बंद पाडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले. नाशिक जिल्ह्यात इतर बाजार समित्या पाठोपाठ येवला कृषी उत्पन्न बाजार समिती देखील मोठी असून त्यात रोज असंख्य शेतकरी कांदा, मका यासह इतर शेतमाल लिलावासाठी घेऊन येतात. लिलाव झालेला माल वाहनात भरण्यासाठी बाजार समितीने मजुरांची व्यवस्था केलेली आहे. शहीद जवानांच्या वीरपत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा, जमिनीसाठी ससेहोलपट सध्या नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली असून आज देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली होती. लिलाव झाल्यानंतर इतर मजुरांसोबत अनिस पठाण हा तरुण मजूर ट्रॅक्टरमध्ये कांदे भरत होता. त्याचवेळी दुसऱ्या एका ट्रॅक्टरने मागून त्याला चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाजार समितीत एकच खळबळ उडाली. आपल्या सहकाऱ्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाल्याचे कळताच इतर मजूर संतप्त झाले आणि त्यांनी लिलाव बंद पाडून ट्रॅक्टर चालकाला अटक करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nashik , yeola
  • First Published :
जाहिरात
जाहिरात