मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik Oxygen tank leak incident: चौकशी समितीच्या अहवालात पालिकेला क्लीन चीट?

Nashik Oxygen tank leak incident: चौकशी समितीच्या अहवालात पालिकेला क्लीन चीट?

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Oxygen Tank Leak) झाल्याची  दुर्घटना घडली होती. तब्बल 24 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केला आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Oxygen Tank Leak) झाल्याची दुर्घटना घडली होती. तब्बल 24 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केला आहे.

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Oxygen Tank Leak) झाल्याची दुर्घटना घडली होती. तब्बल 24 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केला आहे.

नाशिक, 6 मे: नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Oxygen Tank Leak) झाल्याची  दुर्घटना 21 एप्रिल रोजी घडली होती. तब्बल 24 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केला आहे. राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या या अहवालात पालिकेला क्लीनचीट देण्यात आली असून दुर्घटनेचा ठपका ठेकेदारावर ठेवण्यात आल्याची माहिती 'New18 लोकमत'ला सूत्रांनी दिली आहे.

काय घडला होता प्रकार?

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी  21 एप्रिल 2021 हा सून्न करणारा दिवस ठरला. त्या दिवशी पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Oxygen Tank Leak) झाल्याची घटना घडली. त्यानंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तासाठी खंडीत झाला. 20 KL क्षमतेची ऑक्सिजन टाकी लीक झाल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला.  हा प्रकार घडला त्यावेळी रुग्णालयात 150 रुग्ण होते. त्यापैकी 23 जण रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांनी सादर केला आहे.

अहवालात काय?

विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात पालिकेला क्लीन चीट देण्यात आली असून ठेकेदारावर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पालिका आणि ठेकेदारांमधील करारनाम्यात कोणतीही तांत्रिक दुरुस्ती 24 तासांमध्ये करण्याची शिफारस आहे. मात्र या या कामासाठी 72 तास लागले. टँक आणि पुरवठा या दोन्ही गोष्टींना ठेकेदार जबाबदार असून आवश्यक यंत्रणा बसवण्याची जबाबदारी देखील त्याचीच असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पाईपलाईनची गुणवत्ता योग्य असल्याचा निष्कर्ष देखील या अहवालात सादर करण्यात आला आहे.

News 18 लोकमतचे सवाल

विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतर काही गंभीर प्रश्न News18 लोकमतनं उपस्थित केले आहेत. 24 तासात तक्रार सोडवा ही बेजबाबदार अट करारनाम्यात कोणी टाकली? यासाठी पालिका प्रशासन दोषी नाही का? पाईपलाईन योग्य असेल तर लिकेज कसं झालं? ठेकेदार कराराचं उल्लंघन करत असेल तर त्याला पालिका अधिकारी जबाबदार का नाहीत? हे जबाबदार अधिकारी निर्दोष कसे? सदोष मनुष्यवधाला जबाबदार कोण ? या चौकशी समितीमध्ये पालिका अधिकाऱ्यांना घेण्याचं कारण काय? हे प्रश्न News 18 लोकमतनं उपस्थित केले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात लसीकरणाचा फज्जा, संतप्त नागरिकांची डॉक्टरांना धक्काबुक्की

या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली तरच 24 जणांच्या मृत्यूला जबाबदार व्यक्तींना शिक्षा मिळू शकते. तसंच या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना न्याय मिळणार आहे.

First published:

Tags: Hospital Fire, Maharashtra, Nashik, Oxygen leak, Oxygen supply