नंदुरबार, 26 जानेवारी : दोन्ही हाताने व्यंग, अशातच घरची हालाकीची परिस्थिती, त्यातही अवघ्या आठ वर्षांच्या कोवळ्या वयात आई घर सोडुन गेली. तरीही या विपरीत परिस्थितीमध्ये शिक्षणाची प्रबळ इच्छाशक्ती असलेला एक गणेश आपल्या व्यंगत्वावर मात करत आयुष्याचा लढा देत आहे. त्याला आर्थिक मदत मिळावी म्हणून न्यूज 18 लोकमतकडून आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणाऱ्या गणेश माळी या 8 वर्षीय मुलाची कहाणी सध्या अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. आठ वर्षाच्या मुलाच्या आयुष्यात असा कोणता मोठा संघर्ष असेल? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल, गणेशचा संघर्ष वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
गणेश अनिल माळी हा दुसरीत शिकतो. मात्र, त्याला जन्मापासुन दोन्ही हातच नाही. तरी त्याची जगण्यासोबतची लढाई काही कमी झालेली नाही. त्याला हात नसताना देखील त्याने वयाच्या अवघ्या आठ वर्षात आपल्या अंपगत्वावार मात करत शिक्षणासाठी घेतलेली भरारी भल्या भल्यांना अचंबित करणारी आहे. काही कौटुंबिक कारणास्तव तो लहान असतानाच आई घर सोडुन गेली. अशात गणेशच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याचे वडीलच सांभाळत आहे. सकाळी चार वाजता उठुन त्याचे वडील त्याच्या नित्यचर्येसाठी त्याल मदत करतात.
गणेश माळीची अपंगत्वावर मात
विशेष म्हणजे गणेशला हात नसल्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तो पायाने अक्षर गिरवण्याच काम करत आहे. पायाने लिखाणासोबतच तो अनेक गोष्टी सराईतपणे करतो. जेवणाचा प्रश्न म्हणाल तर पायच हाताचं काम करतात. वर्गातील मित्रही त्याला अभ्यासात सहकार्य करतात. या कोवळ्या वयातही त्याची शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याच अपंगत्व थांबवु शकलेलं नाही. शिक्षणासोबत खेळातील त्याची आवड आणि मैदानातील चपळता भल्या भल्यांना आवाक करणारी आहे.
पण घराच्या गरीबीमुळे तो आणखी किती तग धरणार हा प्रश्न त्याच्या शिक्षकांसह गावातील त्यांच्या शुभचिंतकांनाही भेडसावत आहे. वडील मोल मजुरी करुन कसाबसा कुटुंबाचा गुजारा करत असल्याने आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहणाऱ्या गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रीम अवयवांसाठी आणि त्याच्या जीवनाच्या लढाईसाठी मदतीची अपेक्षा त्याच्या जवळचे मंडळी करत आहे.
त्याच्या जवळच्या मंडळींनी हे आवाहन केल्यावर न्यूज 18 लोकमतकडूनही त्याच्या मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे. जर तुम्हाला गणेशला आर्थिक मदत करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करुन त्याला तुमच्या यथाशक्तीप्रमाणे आर्थिक मदत करू शकतात.
गणेशच्या वडिलांचा मोबाईल नंबर - अनिल माळी - 9529930880
आर्थिक मदतीसाठी फोन पे आणि पेटीएम नंबर - 7498970392
सूचना - गणेशला आर्थिक मदत करण्यापूर्वी तुम्ही या नंबरवर संपर्क करुन पडताळणी करुन घ्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nandurbar