मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याला कुणी फसवलं? स्पीड पोस्टने पाठवली ईडीची नोटीस!

महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्याला कुणी फसवलं? स्पीड पोस्टने पाठवली ईडीची नोटीस!

काँग्रेस नेत्याला ईडीची फेक नोटीस

काँग्रेस नेत्याला ईडीची फेक नोटीस

देशभरामध्ये ईडीच्या कारवायांची संख्या मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यातच आता ईडीच्या फेक नोटीसचा धक्कादायक प्रकारही समोर येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India

मुजीब शेख, प्रतिनिधी

नांदेड, 23 मार्च : देशभरामध्ये ईडीच्या कारवायांची संख्या मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महाराष्ट्रातही ईडीच्या कारवाईमुळे अनेक नेत्यांना तुरुंगाची हवा खायला लागली आहे. भाजप विरोधकांकडून ईडीचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे, तसंच विरोधकांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिलं.

एकीकडे देशभरात ईडीच्या कारवाया सुरू असतानाच नांदेडमध्ये काँग्रेसच्या नेत्याला ईडीची खोटी नोटीस आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला यांना स्पीड पोस्टने ईडीची नोटीस मिळाली.

शमीम अब्दुल्ला यांनी ईडीच्या मुंबई कार्यालयात नोटीसबाबत चौकशी केली, तेव्हा अशी कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचं ईडीच्या कार्यालयातून सांगण्यात आलं, असा दावा शमीम अब्दुल्ला यांनी केला आहे. या बनावट नोटीसबाबत शमीम अब्दुल्ला यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महापालिकेच्या गुंठेवारी प्रकरणामध्ये ईडीची चौकशी सुरू आहे.

नांदेड महापालिकेत  गुंठेवारी विभागातील बनावट प्रमाणपत्र दिल्याचा घोटाळा उघड झाला होता. गुंठेवारी विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. गेल्या डिसेंबर मध्ये या प्रकरणात नांदेड मधील वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता. जानेवारी मध्ये ईडीच्या नागपूर पथकाने नांदेड पालिकेत येईन चौकशी देखील केली होती. बनावट गुंठेवारीच्या अनेक फाईल नागपूरच्या ईडी पथकाने ताब्यात घेतल्या होत्या. याच संदर्भाद आज शमीम अब्दुल्ला यांना नोटिस आली. विशेष म्हणजे चौकशी ईडीच्या नागपूर पथकाकडे आणि नोटीस आली मुंबई कार्यालयातून, त्यामूळे संभ्रम निर्माण झाला. दरम्यान शमीम अब्दुल्ला यांच्या तक्रारीची चौकशी सुरू असून फेक नोटीस असेल तर कारवाई केली जाईल असं पोलीसांनी सांगितलं.

देशभरात सुरू असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवायांविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचं सांगत विरोधकांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात चिंता व्यक्त केली. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या भ्रष्ट नेत्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचंही विरोधकांनी या पत्रात नमूद केलं आहे.

काँग्रेस नेते शमीम अब्दुल्ला

या पत्रामध्ये विरोधकांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सर्मा, टीएमसीचे माजी नेते सुवेंद्रू अधिकारी आणि मुकूल रॉय यांच्या नावाचा उल्लेख केला. हेमंता बिस्वा सर्मा यांची शारदा घोटाळा प्रकरणी ईडी आणि सीबीआयने चौकशी केली. तर सुवेंद्रू अधिकारी आणि मुकूल रॉय नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआय आणि ईडीच्या रडारवर होते. या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचं विरोधक पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत.

First published:
top videos