जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / तरुणीला वाचवण्यासाठी ब्रेक मारला अन् अरबाजचं डोकं स्कुल व्हॅनच्या चाकाखाली सापडलं VIDEO

तरुणीला वाचवण्यासाठी ब्रेक मारला अन् अरबाजचं डोकं स्कुल व्हॅनच्या चाकाखाली सापडलं VIDEO

तरुणीचा जीव वाचवण्यासाठी ब्रेक मारला पण स्वत:चाच जीव गेला

तरुणीचा जीव वाचवण्यासाठी ब्रेक मारला पण स्वत:चाच जीव गेला

रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्नात स्कूटीचालक स्कूल बस खाली सापडून ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना नांदेडमध्ये घडली आहे.

  • -MIN READ Nanded,Maharashtra
  • Last Updated :

मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड, 26 जुलै : रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्नात स्कूटीचालक स्कूल बस खाली सापडून ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना नांदेडमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील पीर नगर भागात ही घटना घडली. सय्यद अरबाज असं मयत युवकाचे नाव आहे. तो बारावीचा विद्यार्थी होता. कॉलेजहून परत घरी येत असताना पीर नगर भागात समोरून स्कूलबस वेगाने येत होती. अरबाजच्या स्कुटीचा वेग देखील जास्त होता. स्कूलबस जवळ येताच रस्त्यावरून एक मुलगी जात होती. तिला वाचवण्यच्या प्रयत्नात अरबाजची स्कुटी स्लिप झाली आणि तो खाली कोसळला. स्कुटीची मुलीला धडक बसली. पण समोरून येणाऱ्या मिनी स्कुल बसखाली अरबाज सापडला.

जाहिरात

डोक्यावरून चाक गेल्यामुळे अरबाज गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या 6 सेकंदात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात