मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

PM Modi Birthday : हा तर बेरोजगारी दिवस म्हणत यवतमाळमध्ये चहा, पकोडे तळत निषेध

PM Modi Birthday : हा तर बेरोजगारी दिवस म्हणत यवतमाळमध्ये चहा, पकोडे तळत निषेध

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली वडनगरमधील दामोदार दास मूलचंद मोदी आणि हीराबेन यांच्या घरात झाला.

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली वडनगरमधील दामोदार दास मूलचंद मोदी आणि हीराबेन यांच्या घरात झाला.

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली वडनगरमधील दामोदार दास मूलचंद मोदी आणि हीराबेन यांच्या घरात झाला.

यवतमाळ, 17 सप्टेंबर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर 22) 72 वा वाढदिवस आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टी यानिमित्ताने देशासोबतच जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जगातील अनेक नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यवतमाळमध्ये हाच दिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आज यानिमित्ताने अभिवन आंदोलनही करण्यात आले. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी आंदोलन - यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवशी महाबेरोजगारी दिन म्हणून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेय आज यानिमित्ताने सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पकोडे तळून, चहा वाटप करून केले अभिनव आंदोलन केले. महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी देणारे उद्योगधंदे पळवून लावणाऱ्या या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात धरणे देत सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आंदोलन केले. हे आंदोलन यवतमाळ विधानसभा युवक अध्यक्ष विक्की राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आले. विद्यार्थी काँगेस एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के, पंचायतीराज संघटन जिल्हाध्यक्ष आशिष महल्ले, सुरज राजूरकर, राहुल वानखेडे, पंडित कांबळे, यासह विविध कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. हेही वाचा - PM Modi Birthday Special : नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास आणि प्रेरक विचार; पहा PHOTO 17 सप्टेंबर 1950 ला मोदींचा जन्म -  नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली वडनगरमधील दामोदार दास मूलचंद मोदी आणि हीराबेन यांच्या घरात झाला. वडनगरच्या भगवताचार्य नारायणाचार्य शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. लहानपणी त्यांनी शर्मिष्ठा तलावातून एक मगरीचं पिल्लू घरी आणलं होतं. पण, आईच्या सांगण्यावरून त्यांनी ते पुन्हा तलावात सोडलं. 1958 सालच्या दिवाळीला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोदींनी प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्याकडून स्वंयसेवकाची शपथ घेतली. मोदींनी राज्यशास्त्रात MA चं शिक्षण घेतलं आहे. 17 व्या वर्षी नरेंद्र मोदी अहमदाबाद पोहचले. त्यानंतर 1974 साली नवनिर्माण आंदोलनात सहभागी झाले. 2001 मध्ये केशुभाई पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून बाजूल केले आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2012 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी जबरदस्त काम केले आणि 3 वेळा ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजपमध्ये मोदींचा दबदबा इतका वाढला की, ते पंतप्रधान पदाचे दावेदार ठरले. 2013 साली भाजपच्या प्रचार अभियानात पंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावाची घोषणा झाली. 2014 मध्ये ते देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले.
First published:

Tags: Yawatmal, Young Congress

पुढील बातम्या